भाळवणीत शनि आमवस्यानिमित्ताने शनैश्वराला रुद्राभिशेक व तैलाभिषेक

0

महाराष्ट्र दर्शन न्यूज | पारनेर | प्रतिनिधी- सागर आतकर

पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील माळवाडी येथे शनि आमवस्यानिमित्ताने श्री. शनैश्वर रुद्राभिशेक व तैलाभिषेक सोहळा तसेच केंद्रीय मंत्री स्वर्गीय नेते दिलीपजी गांधी यांच्या नावाने उभारलेल्या शनिदरबार सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी परिसरातील भाविकांनी शनिदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

शनिशिंगनापूरच्या धर्तीवर भाळवणी येथील माळवाडी येथे शनि मंदिराची प्रतिकृती रघुनाथ आंबेडर यांच्या सहभागातून उभारण्यात आली आहे. येथे शनि भक्त व लोकसहभागातून या ठिकाणी विविध विकासकामे झाली असून काही सुरू आहेत.

 

याप्रसंगी पारनेरचे पोलिस निरीक्षक घनश्याम बळप, केंद्राच्या रस्ते विकास मंतरलायचे प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवाण, भाजपा युवा नेते सुवेंद्र गांधी, अश्विनी थोरात (भाजपा महिला जिल्हाध्यक्षा), वसंत चेडे(भाजपा तालुकाध्यक्ष), सरपंच लिलाताई रोहोकले तसेच उद्धवराव अमृते, अमरेश सहाय, सागर मैड, दत्ता परभणे, बाळासाहेब पोटघन आदी उपस्थित होते. 

यावेळी हभप बाळासाहेब महाराज दळवी यांचे प्रवचन झाले. बाळासाहेब रोहोकले व भाऊसाहेब नागुजी चेमटे यांच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे संयोजन रमेश रोहोकले, अरुण रोहोकले, संदीप रोहोकले, जगदीश आंबेडकर, सुजीत आंबेडकर यांनी केले. तर बी.वाय. रोहोकले यांनी सूत्रसंचलन व रघुनाथ आंबेडकर यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top