महाराष्ट्र दर्शन न्यूज | मुंबई :
दुचाकी विक्रीच्या बाबतीत हिरो मोटोकॉर्प ही भारतातील पहिल्या क्रमांकाची वाहन कंपनी आहे. कंपनीने कम्युटर बाइक सेगमेंटमध्ये चांगल्या मायलेजसह अनेक बाइक्स सादर केल्या आहेत. विशेष बाब म्हणजे जगभरात सर्वाधिक दुचाकी विकण्याचा रेकॉर्ड या कंपनीच्या नावावर आहे.
काय सांगते आकडेवारी :- हिरो मोटोकॉर्प या कंपनीने 2022-23 या आर्थिक वर्षात धडाक्यात सुरुवात केली आणि गेल्या एप्रिल महिन्यात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 4 लाख 18 हजार 622 मोटारसायकली आणि स्कूटर विकल्या आहेत. यापैकी देशांतर्गत बाजारात एकूण 3,98,490 युनिट्सची विक्री केली आहे आणि कंपनीने 20,132 युनिट्सची आंतरराष्ट्रीत बाजारात निर्यात केली आहे.
एप्रिल 2021 मध्ये, हिरो मोटोकॉर्पने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात केवळ 3.72 लाख युनिट्सची विक्री केली होती, ज्यामध्ये यावर्षी एप्रिलमध्ये 12 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर मार्च मध्ये हिरो मोटोकॉर्पने देशांतर्गत बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय बाजारात 4.50 लाख दुचाकी विकल्या होत्या.
कंपनीच्या हिरो स्प्लेंडर, एचएफ डीलक्स, पॅशन प्रो या दुचाकी गेल्या अनेक वर्षांपासून विक्रीच्या बाबतीत टॉप 10 मध्ये आहेत. तसेच हिरो डेस्टिनी, हिरो मायस्ट्रो आणि प्लेजर या स्कूटरचीही चांगली विक्री होते. आगामी काळात, हिरो मोटोकॉर्प आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, या स्कूटरची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद