मुलांच्या भविष्यासाठी सरकारच्या कोणत्या दोन योजना फायदेशीर? ‘या’ आहेत त्या योजना ज्या देतात भक्कम व्याजदर..

0


महाराष्ट्र दर्शन न्यूज

आपण कोणत्या योजनेत गुंतवणूक करत असू तर आपल्याला आधी परतावा आणि कर यांबद्दल संपूर्ण माहिती घ्यावी लागेल. यासोबतच कोणती योजना आपल्याला अधिक फायदेशीर राहील आणि व्याजदर किती मिळेल याकडेही लक्ष द्यावं लागेल. आपल्या कुटुंबातील मुलीच्या पुढील आयुष्यासाठी सर्वोत्तम गुंतवणूक म्हणून तुम्ही काही योजनेत गुंतवणूक करायचं ठरवलं असेल तर आज योग्य पर्याय कोणता ते समजावून घ्या. मुलींचं शिक्षण आणि लग्नाचा खर्च याच्या नियोजनासाठी सरकार अनेक योजना आणते. अशाच दोन योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हीही चांगला रिटर्न मिळवू शकता.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojna)

1) सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)

कमी जोखमीची व गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी किंवा PPF योजनेमध्ये तुम्ही 15 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. या योजनेचा लॉक इन कालावधी 5 वर्षांचा आहे. तुम्ही PPF खात्यात जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत करात सूट मिळते. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हा सर्वोत्तम कर बचत पर्यायांपैकी एक आहे.

एका आर्थिक वर्षात, तुम्हाला किमान गुंतवणूक रक्कम 500 रुपये आणि गुंतवणूकीची कमाल रक्कम 1.5 लाख रुपये असल्याने एवढे पैसे गुंतवण्याची संधी मिळेल. तुम्ही गुंतवणूक केल्यास यात सुमारे 7.1 टक्के वार्षिक व्याजदर मिळतो. तुम्हाला अचानक पैशांची गरज लागली तर तुम्ही 5 वर्षांनंतर एकूण ठेवीपैकी 50 टक्के रक्कम देखील काढू शकता. तुम्ही मुलगा आणि मुलगी या दोघांसाठी या योजनेत गुंतवणूक करू शकता. तुम्ही सार्वजनिक तसेच खाजगी बँकांमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पीपीएफ खाते उघडू शकता.

2) सुकन्या समृद्धी योजना (SSY)

केंद्र सरकारच्या अल्प बचत योजनांमध्ये सध्या मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेत सर्वाधिक 7.6 टक्के व्याज देण्यात येत आहे. या योजनेत, गुंतवणूकदाराला वार्षिक 7.6 टक्के व्याजदर मिळतो. या योजनेत, तुम्हाला एका वर्षाच्या आत किमान 250 रुपये जमा करणे बंधनकारक आहे. त्याच वेळी या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये वर्षाला गुंतवणूक करू शकता. या योजनेअंतर्गत 0 ते 10 वर्षे वयोगटातील मुलींचे खाते सुरु करता येते. सुकन्या समृद्धी योजनेसंबंधी नवीन खातं सुरु करण्याची सुविधा टपाल कार्यालयात तसेच सार्वजनिक आणि खासगी बँकांमध्ये दिली जाते.

प्रत्येक पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी असते. त्यामुळेच त्यांचे शिक्षण उत्तम व्हावे आणि चांगल्या पद्धतीने त्याची वाढ व्हावी यासाठी सर्व जण प्रयत्न करत असतात. पालकांना मुलांच्या शिक्षणासोबत त्यांच्या लग्नाची देखील काळजी असते. लग्न म्हटले की मोठा खर्च येतो. अशा गोष्टीचा विचार करून सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरु केली आहे. यामध्ये मुलगी 18 वर्षांची झाल्यावर, तिच्या शैक्षणिक खर्चासाठी खात्यातून संपूर्ण रकमेपैकी काही पैसे काढू शकता. मुलीच्या अठराव्या वर्षी या योजनेच्या खात्यातल्या उपलब्ध शिल्लकेच्या पन्नास टक्के रक्कम तिच्या शिक्षणासाठी काढता येते आणि बाकी रक्कम 21 वर्षांनंतर किंवा लग्नाच्या वेळेस म्हणजे 18 ते 21 वर्षांदरम्यान कधीही काढता येते. तुम्हाला दोनपैकी कोणत्याही एका योजनेत गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला सुकन्या समृद्धी योजना (SSY) मध्ये जास्त व्याजदर मिळेल. यावरून ही योजना जास्त फायद्याची राहील.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top