महाराष्ट्र दर्शन न्यूज | मुंबई
महाराष्ट्र राज्यात 223 जागांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Electricity Transmission Company Ltd- MSETCL) लवकरच भरती करणार आहे. यासाठीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. सहायक अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (दूरसंचार), सहायक अभियंता (स्थापत्य). या पदांसाठी ही भरती होणार आहे. उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.
अशा आहेत पात्रतेच्या अटी :-
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelor’s Degree in Electrical Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
किती मिळेल वेतन :-
- सहायक अभियंता पारेषण (Assistant Engineer Transmission) – 80,962/ रुपये प्रतिमहिना पगार मिळेल.
- सहायक अभियंता दूरसंचार (Assistant Engineer Telecommunication ) – 80,962/- रुपये प्रतिमहिना तर
- सहायक अभियंता स्थापत्य (Assistant Engineer Civil) – 80,962/- रुपये प्रतीमहिना पगार मिळेल.
अर्ज करण्यासाठी Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाख जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो ही आवश्यक कागदपत्रे आहेत.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद