महाराष्ट्र दर्शन न्यूज
संपूर्ण देश उष्णतेच्या लाटांनी भाजून निघत आहे. महाराष्ट्रालाही काही अंशी या झळा बसत आहेत. पुढील काही दिवस महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये उष्णतेची भीषण लाट राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडला, तर मुंबई आद्रतेचे वातावरण आहे. उत्तर पश्चिम आणि मध्य भारतात ही लाट राहील. ईशान्य भारतही या काळात तापलेला आहे, त्यामुळे वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात, विशेषतः विदर्भात यलो व ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला विदर्भातील कमाल तापमान 46 अंशाखाली आले आहे.
विदर्भात उष्णतेची झळ कमी होत आहे, काही दिवसांपासून उत्तर मध्य महाराष्ट्रात चाळीशीपार गेलेले कमाल तापमान आता उकळू लागले आहे. तसेच हिंगोलीसह नजीकच्या भागांत पावसाच्या नोंदीही झाली. पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
देशभरात अनेक शहरांत तापमानाने 45 अंशांचा टप्पा पार केला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी पुढीप्रमाणे हवामानाचा अंदाज वर्तविला आहे. 5 मे रोजी कोकण आणि मराठव्यातील हवामान कोरडे राहील तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहील. 6,7 आणि 8 मे रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. उष्णतेची लाट विदर्भात तुरळक ठिकाणी असेल. पश्चिम राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये 6 मे ते 8 मे या दरम्यान उष्णतेची लाट असेल. तर पूर्व राजस्थानात 7 मे ते 8 मे दरम्यान उष्णतेची लाट राहील.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद