ॲमेझॉनचा धमाकेदार सेल! ‘या’ कंपनीचे मोबाईल मिळताय आता निम्म्याहूनही कमी किंमतीत..

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज

भारतातील लोक साध्या फिचर फोनपासून ते स्मार्टफोन पर्यंत वापर करत आहेत. मागील दशकाहुन अधिक कालावधीपासून टॉप ब्रँडपैकी एक राहिलेला सॅमसंग (Samsung) हा एक ब्रँड आहे. भारतीय लोकांकडे या कंपनीचे विविध मॉडेल्स असतात. लोकांच्या गरजा ओळखून नवीन फोन्सची निर्मिती करून आवडीची कंपनी बनलेल्या सॅमसंगचे आता ॲमेझॉन सॅमसंग समर सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्स स्वस्तात मिळत आहेत, ज्यावर ऑफर्सचा वर्षाव होत आहे.

ॲमेझॉन समर सेलमध्ये 10 स्मार्टफोन्सवर बंपर सूट

1) Samsung Galaxy M33 5G

Samsung Galaxy M33 स्मार्टफोन या सेलमध्ये 28 टक्के सूटसह मिळत आहे. याची मूळ किंमत 24,999 असून हा इथे फक्त 17,999 ला तुम्ही घेऊ शकता. तुम्ही जवळपास 7 हजारांची सूट खरेदी करताना मिळवू शकता.

2) Samsung Galaxy M53 5G

Samsung Galaxy M53 या स्मार्टफोनची मूळ किंमत 32,990 रुपये असली तरी याची सेलमध्ये 26,499 रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. म्हणजेच तुमची तब्बल 6,491 रुपयांची बचत होणार आहे. हा स्मार्टफोन ॲमेझॉन समर सेल 2022 मध्ये 20 टक्के सवलतीत उपलब्ध आहे.

3) Samsung Galaxy M32

Amazon Summer Sale (ॲमेझॉन समर सेल) मध्ये Samsung Galaxy M32 वर 29 टक्के सूट दिली गेली आहे. या मोबाईलची मूळ किंमत 16,999 असून तो ऑफरमध्ये तुम्हाला फक्त 11,999 रुपयांना मिळू शकतो. यामध्ये तुम्ही 5,000 रुपये वाचवू शकता.

4) Samsung Galaxy M52 5G

सॅमसंगच्या Samsung Galaxy M52 स्मार्टफोनची मूळ किंमत 36,999 असून 35 टक्के सवलतीसह हा फोन तुम्ही केवळ 23,999 रुपयांना खरेदी करू शकता. म्हणजे यामध्ये तुम्ही 13,000 रुपये बचत करु शकता.

5) Samsung Galaxy M12

Samsung Galaxy M12 स्मार्टफोनची मूळ किंमत 12,999 रुपये असली तरी हा स्मार्टफोन तुम्हाला ऑफरमध्ये 9,499 रुपयांना मिळू शकतो. ग्राहक अंदाजे 3 हजार 500 रुपये सवलतीसह 27 टक्के सवलत मिळवू शकतात.

6) Samsung Galaxy S20 FE 5G

Samsung Galaxy S20 FE या 5G स्मार्टफोनवर ॲमेझॉनकडून 53 टक्के एवढी मोठी सूट दिली जात आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 74,999 इतकी असून तो तुम्ही सवलतीच्या दरात फक्त 34,990 रुपयांत खरेदी करू शकता. यामुळे तुमची 40,009 रुपयांची बचत होऊ शकते.

7) Samsung Galaxy A22 5G

Samsung Galaxy A22 स्मार्टफोनची येथे मूळ किंमत 22,499 रुपये असली तरी या सेलमध्ये 18,999 रुपयांना ऑफरमध्ये हा फोन उपलब्ध आहे. खरेदी करताना तुम्हाला या स्मार्टफोनवर 16 टक्के सवलत मिळू शकते. 3 हजार 500 रुपयांची बचत होऊ शकते.

8) Samsung Galaxy A52s 5G

Samsung Galaxy A52s हा स्मार्टफोन 40,999 रुपयांच्या किंमतीस विकला जात असून सध्या सेलमध्ये हा केवळ 32,499 रुपयांना तुम्ही खरेदी करू शकता. अशी तब्बल 21 टक्क्यापर्यंत मोठी सूट मिळून तुमची 8,500 रुपयांची बचत होणार आहे.

9) Samsung Galaxy S21 5G

Samsung Galaxy S21 हा स्मार्टफोन 83,999 रुपये या मूळ किंमतीस उपलब्ध असून, तो तुम्ही सेलमध्ये अवघ्या 58,999 रुपयांना खरेदी करू शकणार आहात. या फोनवर 30 टक्क्यांची सूट असून तुम्ही 25,199 रुपयांची बचत करू शकतात.

10) Samsung Galaxy Z Flip3 5G

जगात चर्चेत राहणाऱ्या म्हणजेच Samsung Galaxy Z Flip3 या स्मार्टफोनची मूळ किंमत 99,999 रुपये आहे. पण सेलमध्ये हा स्मार्टफोन तुम्ही फक्त 88,999 रुपयांना खरेदी करू शकता. म्हणूनच 11 टक्के सवलतीसह 10,999 रुपयांची बचत तुम्ही करू शकता.

Source

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top