गंगाराम शेठ बेलकर मित्र परिवाराच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप

0

महाराष्ट्र दर्शन न्युज / पारनेर प्रतिनिधी- सागर आतकर

पारनेर तालुक्यातील सावरगाव या ठिकाणी गंगाराम शेठ बेलकर मित्र परिवाराच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आले.

१५ ऑगस्ट अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिनानिमित्त गंगाराम शेठ बेलकर यांच्या वतीने हनुमान विद्यालय सावरगाव येथील शंभर विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आले. यावेळी सावरगाव या ठिकाणी हनुमान मंदिरामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी गंगाराम शेठ बेलकर माजी सभापती पंचायत समिती पारनेर, सरपंच परिषद जिल्हा समन्वयक मोहन रोकडे, सावरगावचे उपसरपंच गुगळे, सुनील बेलकर, शाळेचे मुख्याध्यापक सावरगाव ग्रामस्थ व हनुमान विद्यालयातील विद्यार्थी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top