श्री. मुलिकादेवी महाविद्यालयात बी. एस्सी. कॉम्प्युटर सायन्स अभ्यासक्रमाला मंजुरी

0



महाराष्ट्र दर्शन न्युज / पारनेर - निघोज

पारनेर तालुक्यातील निघोज येथील श्री मुलिकादेवी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून बी. एस्सी. कॉम्प्युटर सायन्स (संगणकशास्त्र) हा अभ्यासक्र सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर यांनी दिली.

श्री मुलिकादेवी महाविद्यालयाची स्थापना २०१३ मध्ये झाली असून अल्पावधीतच या महाविद्यालयाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नावलौकिक मिळवला आहे. म्हणूनच एक उपक्रमशील व गुणवत्तापूर्ण महाविद्यालय असा उल्लेख मुलिकादेवी महाविद्यालयाचा केला जातो.

महाविद्यालयात कला व विज्ञान शाखा असून कला शाखेसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल हे विषय तर 

विज्ञान शाखेसाठी प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, इलेक्ट्रॉनिक या विषयाचे अध्यापन केले जाते. महाविद्यालयाची सुसज्ज इमारत उपलब्ध असून उच्चशिक्षित पात्रता प्राप्त प्राध्यापक वर्ग, भव्य क्रीडांगण, सुसज्ज ग्रंथालय, शांतीनिकेतन मुक्त वाचनालय, वनस्पतीशास्त्र उद्यान असून अतिशय निसर्गरम्य परिसरात हे महाविद्यालय आहे.

महाविद्यालयाची वाटचाल 

विद्यार्थी केंद्रबिंदू मानून केली जाते. महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या ठिकाणी उच्चपदावर कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना सतत चालना देणारे नावीन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात. या सर्वांचा परिपाक म्हणून 'नॅक' मूल्यांकनात महाविद्यालयाने अल्पावधीतच 'बी' श्रेणी प्राप्त केली आहे. व यशाचा आलेख उंचावत ठेवला आहे.

महाविद्यालयात बी. एस्सी. कॉम्प्युटर सायन्स अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी मिळाल्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी संगणकशास्त्र अभ्यासक्रमाची सुविधा उपलब्ध झाली आहे. सदर अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता प्रवेश सुरू झाले असल्याची माहिती उपप्राचार्य डॉ. मनोहर एरंडे यांनी दिली.

महाविद्यालयासाठी संगणकशास्त्र अभ्यासक्रमाला मिळालेल्या परवानगी बद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी.डी खानदेशे, सहसचिव ॲड. विश्वासराव आठरे, खजिनदार डॉ. विवेक भापकर, जेष्ठ विश्वस्त सीताराम खिलारी, सदस्य राहुल झावरे पाटील यांनी प्राचार्य डॉ. सहदेव आहेर, उपप्राचार्य डॉ. मनोहर एरंडे व सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

महाविद्यालयाच्या माध्यमातून परिसरात शैक्षणिक संस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाविद्यालयात अद्यावत सोई सुविधा उपलब्ध असून संगणकशास्त्र अभ्यासक्रमाला परवानगी मिळाल्यामुळे महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली असून तंत्रज्ञानावर आधारित व कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रम येथे सुरू होत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. - नंदकुमार झावरे पाटील

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top