कोरठण येथे खंडेराय-म्हाळसा देवी विवाह

0





महाराष्ट्र दर्शन न्युज / श्री.क्षेत्र कोरठण / प्रतिनिधी सागर आतकर

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेलं श्री. क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा, ता पारनेर, जि. अहमदनगर या 'ब' वर्ग तीर्थक्षेत्रावर चंपाषष्ठी रौप्य महोत्सवी उत्सवानिमित्त कुलस्वामी खंडेराय चरित्र कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कथाकार ह.भ .प डॉ. गजानन महाराज काळे यांच्या रसाळ अमृतवाणीतून भाविक भक्त कथा श्रवण करीत आहेत. महाराजांनी आजचे पाचवे पुष्प सादर करतांना चरित्र कथेमधून घटस्थापना म्हणजे काय? जेजुरीतील नवरात्र वृत्त कसे असते? कुलस्वामी खंडेरायांचे चमत्कार, भक्तीचे प्रकार याबाबतीत उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर खंडेराय आणि म्हाळसा यांचा विवाह प्रसंग हुबेहूब साकार करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. जय मल्हार विद्यालयातील विद्यार्थी करण भांबरे, प्रमोद सुंबरे, प्रणव बोरुडे, वृषाली राजदेव, शेख अलिशा साईराज तिकोने, तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी सुरज भांबरे व आरती भांबरे या जोडप्याने खंडेराया म्हाळसादेवी विवाह प्रसंगांमध्ये सचित्र सहभाग नोंदवला. काही क्षण तर उपस्थित भाविक भक्त या विवाह सोहळ्याचे दृश्य पाहून भारावून गेले. शिवाजी ढोमे, विक्रम ढोमे, लहू सुंबरे आदींनी भाग घेतला.

याप्रसंगी देवस्थानचे उपाध्यक्ष महेश शिरोळे, खजिनदार तुकाराम जगताप, मा.अध्यक्ष ॲड पांडुरंग गायकवाड, मा. सरपंच अशोक घुले, विश्वस्त रामदास मुळे, धोंडीभाऊ जगताप, अर्जुन लाड पाटील, दत्तात्रय खोसे, ह.भ.प जनार्दन महाराज मुंडे, मार्तंड जगताप, किसन मुंडे, बाळासाहेब मुंडे ,राहुल गुंजाळ, मच्छिंद्र गुंजाळ, रमेश भगत, प्रदीप पिंगट, विलास पोटे, विटेकर साहेब पिंपरी पेंढार तसेच परिसरातील महिला भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

देवस्थान तर्फे पिण्याचे पाणी दर्शन व्यवस्था व पार्किंग यांचे नियोजन आहे. तसेच मंदिरावरील आकर्षक विद्युत रोषणाई ही भावीक भक्तांचे मन आकर्षित करून घेत आहे.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top