महाराष्ट्र दर्शन न्युज/ श्री क्षेत्र कोरठण :
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेलं श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा, ता पारनेर, जि. अहमदनगर या 'ब' वर्ग तीर्थक्षेत्रावर चंपाषष्ठी रौप्य महोत्सवी उत्सवानिमित्त कुलस्वामी खंडेराय चरित्र कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कथाकार ह.भ .प डॉ. गजानन महाराज काळे यांच्या रसाळ अमृतवाणीतून भाविक भक्त कथा श्रवण करीत आहेत. कथा सांगताना महाराजांनी घटस्थापना म्हणजे काय? जेजुरीतील नवरात्र व्रत कसे? भक्तीचे प्रकार कोणते? हे विविध रामायण व महाभारतातील उदाहरणे देऊन भाविक भक्तांना समजावून सांगितले. कुलस्वामी खंडेराय यांनी शरण आलेल्या भक्ताला कशाप्रकारे त्यांचे दुःख दूर केले. हे विविध देखाव्याच्या माध्यमातून सांगितले. या सचित्र देखाव्यात जय मल्हार विद्यालयातील विद्यार्थी यामध्ये शेख फैयाज, सुंबरे प्रमोद, घुले दर्शन, स्मिता उमाप, अंजली शेळके यांनी भाग घेतला. तसेच महारोगी भक्त यांची भूमिका लहू रणशूर यांनी साकार केली. शिवाजी उमाप, विलास माकरे, शिवाजी ढोमे, विक्रम ढोमे, लहू सुंबरे आदींनी भाग घेतला.
देवस्थान तर्फे पिण्याचे पाणी, दर्शन व्यवस्था व पार्किंग यांचे नियोजन आहे. तसेच मंदिरावरील आकर्षक विद्युत रोषणाई ही भावीक भक्तांचे मन आकर्षित करून घेत आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद