शिरूर बस स्थानकाच्या इमारतीचे प्लास्टर पडल्याने महिला जखमी

0



शिरूर / प्रतिनिधी - किरण चौधरी

                नविन शिरूर बस स्थानकाच्या इमारतीच्या छताच्या कॉलमचा प्लास्टरचा काही भाग एका प्रवासी महिलेच्या डोक्यात पडल्याने किरकोळ जखमी झाली असून या इमारतीचे बांधकाम नुकतेच झालेले असल्याने कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमधुन शंका व्यक्त करण्यात येत आहे.

मंगळवार दि.२० रोजी संगीता इंगळे व त्यांचे पती समाधान इंगळे हे गावी जालण्याला जाण्यासाठी शिरूर बस स्थानकात कंट्रोल रूमच्या समोर बसची वाट पहात बसलेले असताना बस स्थानकाच्या छताच्या कॉलमचे प्लास्टरचा काही भाग इंगळे यांच्या डोक्यात पडल्याने त्यांचे डोक्याला जखम होऊन त्या किरकोळ जखमी झाल्या दरम्यान याबाबत त्यांचे पती समाधान इंगळे यांनी त्यांना तत्काळ दवाखान्यात नेवून वैद्यकीय उपचार केले असून याबाबत त्यांनी शिरूरचे आगार व्यवस्थापक यांचेकडे लेखी तक्रार केली असल्याचे सखाराम इंगळे यांनी सांगितले.

तक्रार अर्ज मिळाला असून प्लास्टर पडलेल्या ठिकाणाची पाहणी केली आहे.संबंधीत महिलेला तत्काळ वैद्यकीय मदत करण्यात आली असून याबाबत सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाडणार आहे. - भैरवनाथ दळवी (प्रभारी आगार प्रमुख शिरुर बस स्थानक)


शिरूर बस स्थानकाच्या इमारतीचे काम बीओटी तत्त्वावर नुकतेच झाले आहे तर काही काम सुरू आहे.सदर इमारत नविनच असताना सुद्धा प्लास्टर निखळुन पडुन प्रवासी महिलेच्या डोक्याला मार लागला असून बस स्थानकात रोज हजारो प्रवासी येत असतात.आजच्या घटनेवरून अनेकांनी कामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण केल्या असून बांधकामांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. -संदिप कडेकर (माजी शहरप्रमुख मनसे)

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top