शिरूर पोलीसांकडून रंगीत तालीम

0



शिरूर / प्रतिनिधी - किरण चौधरी

      दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास कशा प्रकारे हाताळावी यांची रंगीत तालीम ( मॉकड्रिल ) शिरूर पोलीस स्टेशनचेवतीने येथील बसस्थानकासमोर घेण्यात आली. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास शासकीय यंत्रणांच्या सर्तकता व हताळणीबाबात हि रंगीत तालीम असल्याचे शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांनी यावेळी सांगितले. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

बुधवार दि.२० रोजी वेळ सकाळी ११.३० च्या सुमाराची अपघाताच्या कारणावरून अचानक शिरूर बस स्थानकाच्या समोरील रोड रोखून धरत घोषणाबाजी करत दोन गट समोरासमोर येऊन भिडल्याने दंगलसदृश परिस्थितीने तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचा बनाव करण्यात आला होता अशा वेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांनबाबत व हाताळायचे तसेच शासकीय यंत्रणांच्या सर्तकतेविषयी हि रंगीत तालीम घेण्यात आल्याचे शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांनी सांगितले.

यावेळी शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहा पोलीस अधिकारी, तीस पोलीस, नऊ महिला पोलीस, नऊ प्रविष्ट पोलीसांसह दहा गृहरक्षक दलाचे जवान आदींनी या रंगीत तालीममध्ये सहभाग घेतला असल्याचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top