बाबासाहेब कवाद निघोज पतसंस्थेला ४ कोटी ११ लाखाचा नफा - श्री. वसंत कवाद

0

बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेच्या २६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना संस्थेचे चेअरमन वसंत कवाद समवेत व्यासपीठावर  उपाध्यक्ष नामदेवराव थोरात, संचालक मंडळ तसेच माजी सरपंच चंद्रकांत लामखडे व मान्यवर.



निघोज / प्रतिनिधी- सागर आतकर

     निघोज नागरी सहकारी पतसंस्थेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.२४ / ०९/ २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता संस्थेचे चेअरमन मा श्री. वसंत बाबासाहेब कवाद यांच्या अध्यक्षतेखाली पुष्कर लॉन्स येथे निघोज संपन्न झाली. सभेला सुरुवात होणाच्याअगोदर लक्ष्मी मातेचे व स्वर्गीय श्री. बाबासाहेब कवाद यांच्या प्रतिमेचे पुजन निघोज गावचे माजी सरपंच श्री. चंद्रकात लामखडे, श्री ठकाराम लंके यांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर दिप प्रज्वलन संस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद, व्हा. चेअरमन नामदेव थोरात, संचालक चंद्रकांत लामखडे, बाळासाहेब लामखडे, दामूशेठ लंके, अमृता शेठ रसाळ, सोमनाथ वरखडे यांच्या हस्ते करण्यात आले. अहवाल सालात दिवंगत झालेले संस्थेचे मार्गदर्शक स्व. उदयराव शेळके, सभासद, ठेवीदार हितचिंतक यांना श्रध्दांजली अर्पण केली. त्यानंतर सभेला सुरुवात करुन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय लंके यांनी मागील वार्षिक सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. या सभेच्या अजेंठा वरती असणारे सर्व विषय एक मताने मंजुर करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन वसंत कवाद यांनी दि . ३१ / ०३ / २०२३ अखेरच्या संचालक मंडळाने सादर केलेल्या वार्षिक ताळेबंद व नफा -तोटा अहवालाचे वाचन केले. यावेळी संस्थेच्या ठेवीमध्ये ३१ / ०३ / २o२३ नंतर आज पर्यंत २१कोटी २६ लाखाची वाढ होऊन संस्थेच्या २४ / ०९ /२०२३ अखेर संस्थेच्या २११ कोटी २९ लाख ठेवी झालेल्या आहे. संस्थेचे कर्जवाटप १२८ कोटी ९५ लाख, गुंतवणूक १२३ कोटी ५७ लाख, मालमत्ता ४कोटी ५४ लाख, निधी २९ कोटी ६१लाख आहे. संस्थेला ३१ / ०३ / २०२३ अखेर ४ कोटी११ लाखाचा नफा झालेला असुन सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याचे तसेच सोने तारण कर्ज ९ टक्के नी व इतर कर्जाच्या व्याजदरात १ टक्के कपात करण्याचे अध्यक्षांनी यावेळी जाहीर केले. संस्थेमार्फत शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यात संस्थेने भरीव अशी मदत केलेली आहे. या वर्षीही आपल्या संस्थेला राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा बँको पुरस्कार मिळालेला आहे. संस्थेने सभासद, खातेदार यांच्यासाठी संस्थेने नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, नवनवीन योजना, सुविधा याचा अवलंब करीत असल्याने या पुढील ५ वर्षाच्या कालावधीत संस्थेचा १ हजार कोटी पर्यंत व्यवसायामध्ये वाढ करण्याचा मानस आहे. असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगीतले. यावेळी संस्थेचे सभासद महात्मा फुले पतसंस्थेचे अध्यक्ष सोपानराव भाकरे, सोमनाथ वरखडे, अशोक गावडे, सखाराम खामकर, बन्सीशेठ घोडे  अशोक पखाले, चोरे महाराज, पत्रकार भास्कर कवाद या सर्वांनी संस्थेने रौप्यमहोत्सवी वर्ष व संस्थेला बाबासाहेब कवाद यांचे नाव देण्याच्या नामांतर सोहळ्यासाठी आपल्या देशाचे माजी कृषीमंत्री मा . खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब यांचे हस्ते केल्याने तसेच या कार्यक्रमात सभासदाचा चांगला सन्मान केल्याने व रौप्यमहोत्सव कार्यक्रम चांगल्या प्रकारे यशस्वी झाल्याने आपल्या संस्थेच्या संचालक मंडळाचे त्यांनी आभार मानले. त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद यांनी सोने तारणकर्ज व्याज ९ % दराने व इतर कर्जाचे व्याजदर १ % कपात करुन कर्जदार सभासदांना कमी व्याजदराने कर्ज घेण्यास मदत होईल. तसेच संस्थेने नावीन्यपूर्ण असे उपक्रम, प्रशिक्षण राबवून सभासदांना खातेदारांना त्यापासून फायदे होतील. यासाठी चांगले असे कार्यक्रम द्यावे. तसेच संस्थेने सभासद, खातेदार यांना दिलेल्या बँकीग सुविधाच्या प्रगतीबाबत त्यांनी समाधान व्यक्त करून संस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, व कर्मचारी वृंद यांचे त्यांनी आभिनंदन केले .

या वेळी संस्थेचे व्हा .चेअरमन श्री नामदेव थोरात, संचालक चंद्रकांत लामखडे, बाळासाहेब लामखडे, दामुशेठ लंके, भिवाशेठ रसाळ, शांताराम कळसकर, सुनिल मेसे, बाबाजी कळसकर, बाळशिराम डेरे, अभिजित मासळकर, सतीष साळवे, दिलीप सोदक, संचालिका सौ लताबाई कवाद, सौ. वैशाली कवाद उपस्थित होते . 

तसेच संस्थेचे सभासद निघोज परिसर संस्थेचे उपाध्यक्ष अमृता शेठ रसाळ, रामदास शेठ वरखडे, निघोज वि.का. सेवा सोसायटीचे चेअरमन सुनिल वराळ, व्हा. चेअरमन शांताराम लाळगे, संचालक वसंत ढवण, अस्लिम हावलदार, माजी सरपंच राजाराम कवाद, ग्रामपंचायत सदस्य गणेश कवाद, दिगांबर लाळगे, रोहीदास लामखडे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ताजी उनवणे, सुरेश खोसे, भास्कर कवाद, योगेश खाडे, आप्पासाहेब लामखडे, चंदकांत लंके, खंडू लामखडे, दत्तात्रय कवाद, रायचंद गुंड, दिलीप कवाद, किसन कवाद, गणेश लामखडे, खंडू लामखडे, संतोष पंदारे, वसंत शेटे, संदीप रसाळ, बबन तनपुरे, सुरेश लंके, रोहीदास लामखडे, संदीप वराळ, ज्ञानदेव भांबरे, शेंडकर संपत, प्रशांत लोळगे, बन्सी गुंड गुरूजी, रविंद्र रसाळ, अरूण डेरे, निवृत्ती तनपुरे, रविंद्र पवार, विश्वास शेटे, बाबाजी लंके, महेश ढवळे, भंडारी बाळासाहेब, अनिल नऱ्हे, भिमाजी शेटे, चिमाजी मावळे इत्यादी मान्यवर सभासद व संस्थेचे अधिकारी कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री बाळासाहेब लामखडे यांनी केले तर आभार शांताराम कळसकर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top