शिरूर / प्रतिनिधी- किरण चौधरी
ससुन रुग्णालयात आलेल्या गोर गरीब रूग्णांना चांगली वैद्यकीय सेवा देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार असल्याचे ससुन रूग्णालयाचे उपअधिक्षक सुजीत दिव्हारे शिरूर येथे बोलताना म्हणाले.
शिरुर येथील रयत शिक्षण संस्थेच्या दहावी १९९३ बॅचच्यावतीने ससुन रुग्णालयाच्या उपअधिक्षकपदी सुजीत दिव्हारे व सोलापूर विद्यापीठाच्या अधिष्ठातापदी शंकर नवले या दोन्ही मित्रांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सन्मान शिरूर येथे करण्यात आला.यावेळी दिव्हारे बोलत होते.
यावेळी नेत्ररोग तज्ञ डॉ.राहुल घावटे, समर्थ पॅथॉलॉजीचे उदय शिंदे, शिरूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सं.अध्यक्ष संतोष शिंदे, भाजप महिला मोर्चा प्रदेश चिटणीस रेश्मा शेख, संतोष कांबळे, दिपक लुंकड, किरण घेगडे, फिरोज शिकलकर, बालाजी अलमले, मनीष कोठारी, नितीन मुथा, संजय शितोळे, प्रा.संजय काळे, गणेश घाडगे, गणेश देशमाने, वरिष्ठ लिपिक संतोष झगडे, श्रीकांत फलके, इरफान शेख, महेश भोसले, सतिष धुमाळ, भरत गायकवाड, महेश ढेरे, रामदास गायकवाड, प्रदिप जगताप, विजय पवार, राजेंद्र वाखारे आदी उपस्थित होते.
घरची परिस्थिती हालाखीची असतानाही शिक्षणासाठी परिस्थितीशी संघर्ष करून शिक्षण घेतले. ५ वी ते १० वीचे सर्वांचीच बेताची परिस्थिती असलेले माझे मित्र हिच माझी ताकद असून त्यांच्याकडून मिळालेल्या उर्जेतुनच यशस्वी वाटचाल करत असून असल्याचे ससुन रूग्णालयाचे उपअधिक्षक सुजीत दिव्हारे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
गोलेगाव ता.शिरूर येथुन सायकलवरून शिरुरला रयत शाळेत यायचो परंतु परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याची उर्जा मित्रांमधून मिळते. यशासोबत आत्मविश्वास हि तितकाच महत्त्वाचा असून आपले काम प्रामाणिकपणे करत रहा लोक तुम्हाला शोधत आल्या शिवाय राहणार नाही आणि त्यातूनच तुम्हाला संधी उपलब्ध होतील. आयुष्यात ध्येय निश्चित असले पाहिजे आणि त्यादृष्टीने ते गाठण्यासाठी नियोजन करून तशी वाटचाल करा नक्कीच यश तुमचेच आहे. मी देखील ध्येय निश्चित केले असून त्यादृष्टीने वाटचाल सुरू आहे. विद्यार्थी ते अधिष्ठातापर्यंतचा जीवन प्रवास यावेळी बोलताना सोलापूर विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ.शंकर नवले यांनी सांगितला.
मित्रांकडून मिळालेली कौतुकाची थाप आणि सन्मान हा अविस्मरणीय सन्मान असून त्यातून काम करण्याची ऊर्जा मिळाली असल्याचे ससुन रूग्णालयाचे उपअधिक्षक सुजीत दिव्हारे व सोलापूर विद्यापीठाचे अधिष्ठाता शंकर नवले यांनी याप्रसंगी बोलताना आवर्जून सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सतीश धुमाळ यांनी तर आभार संतोष शिंदे यांनी मानले.
ससून रुग्णालयात रुग्णांना थंडी तापापासून ते कर्करोगापर्यंत सर्व रोगांची औषधे अगदी मोफत मिळत आहे. ससून रुग्णालय तृतीयपंथीयांसाठी वेगळा कक्ष सुरू करणारे महाराष्ट्रातील पहिलेच शासकीय रुग्णालय ठरले आहे. त्यांना इतरांप्रमाणेच सर्व आरोग्य सुविधांचा लाभ होत आहे. लॅप्रोस्कॉपिक व बॅरियट्रिक सर्जरी चालू झाल्यामुळे लठ्ठ असणाऱ्या व्यक्तींना लठ्ठपणावर मात करणे सोपे झाले आहे. या सर्व शस्त्रक्रिया ससून रुग्णालयात अगदी मोफत केल्या जात असून या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन ससून रूग्णालयाचे उपअधिक्षक सुजीत दिव्हारे यांनी केले आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद