शिरूर / प्रतिनिधी - किरण चौधरी
शिरूर नगरपरीषदेच्या मुख्याधिकारीपदी स्मिता काळे यांनी पदभार स्वीकारला असून नगरपरिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती सांगितली. यावेळी कार्यालयीन अधीक्षक अयुब सय्यद, प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ उपस्थित होते.
शहर स्वच्छता, पाणी पुरवठा, पथदिवे, रस्ते यांसह नगरपरिषदेचे माध्यमातून देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा लाभ अधिक चांगल्या प्रकारे देण्याबरोबरच शासकीय योजना व कार्यक्रम राबवून त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. स्वच्छता व 'माझी वसुंधरा'अभियानांतर्गत लोकसहभागातून शहरात वृक्षारोपण करून स्वच्छ सुंदर व हरित शिरूर शहर करण्याचा माणस असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी केले.
नागरिकांनी गणेश विसर्जनासाठी नगरपरीषदेच्यावतीने शहरातील रयत शाळा मैदान, कुंभार घाट, विसर्जन घाट, गुजरमळा आदी परिसरात गणेश विसर्जनासाठी जलकुंभ व निर्माल्य कलश उभारण्यात येणार असून नागरिकांनी गणेश मुर्तीचे विसर्जन जलकुंभ आत करून निर्माल्य इतरत्र न टाकता निर्माल्य कलशात टाकावे तसेच गणेश मूर्ती संकलनासाठी विसर्जन घाटावर व्यवस्था करण्यात येणार आहे. - स्मिता काळे (मुख्याधिकारी शिरूर नगरपरिषद)
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद