पाटोदा / प्रतिनिधी - गणेश शेवाळे
पाटोदा ग्रामीण रुग्णालय म्हणजे बाहेरून देखणे आतुन फेकणे असाच काही प्रकार ग्रामीण रुग्णालयात पाहिला मिळत आहे. मागील काही महिने आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे झाल्यामुळे सर्व डॉक्टर मुख्यालयी राहत असत यामुळे रुग्णांना योग्य वेळी उपचारही मिळत असत, मात्र आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली होताच पाटोदा ग्रामीण रुग्णालयाचा कारभारात बदल झालेला पाहिला मिळत असुन पाटोदा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर व कर्मचारी वेळेवर येत नसल्याने रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकाना ताटकळत वाट पाहत बसावे लागते तसेच रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी रहाण्याचे आदेश असताना काही डॉक्टर व कर्मचारी जिल्ह्याच्या व इतर ठिकाणा वरुन ये जा करतात यामुळे ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नाहीत. यामुळे पाटोदा ग्रामीण रुग्णालयात बायोमेट्रिक थम मशीन बसवण्यात आल्यावर डॉक्टर कर्मचारी वेळेवर उपस्थित राहतील व रुग्णांना वेळेवर उपचार मिळतील यामुळे आरोग्य प्रशासनाने पाटोदेकराचा अंत न पाहता या गंभीर विषयावर तात्काळ लक्ष घालून काही अनर्थ घडण्या आधीच तात्काळ उपयोजना कराव्यात नाहीतर याचे परिणाम खुप भयंकर दिसतील यामुळे पाटोदा ग्रामीण रुग्णालयात बायोमेट्रिक थम मशीन बसवण्यात यावा अशी मागणी भारतराष्ट्र समितीच्या आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाच्या निलाताई पोकळे यांनी केली आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद