गोर गरीब रूग्णांना आरोग्य शिबीराच्यामाध्यमातुन विनामुल्य वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याचे खिदमत फाउंडेशनचे उपक्रम कौतुकास्पद - प्रकाशशेठ धारिवाल

0


शिरूर / प्रतिनिधी - किरण चौधरी

     हजरत मोहंम्मद पैगंबर जयंतीनिमित्त शिरूर येथील खिदमत फाउंडेशनच्यावतीने नगरपरिषदेच्या मंगलकार्यालयात आयोजित मोफत महा आरोग्य शिबीर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती धारिवाल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे, माजी नगराध्यक्ष नसीम खान, माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे, माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण, लोकशाही क्रांती आघाडीचे रविंद्र धनक, माजी नगरसेवक विनोद भालेराव, मंगेश खांडरे, अबिद शेख, सुकुमार बोरा, मराठा सेवा संघाचे नामदेवराव घावटे, मुस्लिम जमातचे अध्यक्ष इक्बालभाई सौदागर, डॉ.आकाश सोमवंशी, डॉ.अखिलेश राजुरकर, डॉ.परवेज बागवान, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष शितोळे, शहराध्यक्ष शरद कालेवार, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सुनील जाधव, संघपती मुन्ना चोरडिया, प्रकाश बाफणा उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद व भाजपचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी यांनी शिबिरास भेट दिली.

खिदमत फाउंडेशनच्यावतीने नगरपरिषदेच्या मंगलकार्यालयात आयोजित मोफत महा आरोग्य शिबीर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात आजाराविषयी मोफत सल्ला, मोफत आरोग्य तपासणी, शुगर तपासणी, मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया, इ.सी.जी, ब्लड प्रेशर व मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या शिबिराचा तीनशे पन्नास नागरिकांनी लाभ घेतला. शिबीराचे आयोजन खिदमत फाऊंडेशन शिरूरचे अध्यक्ष हाजी असिफ हाजी हमिद शेख, उपाध्यक्ष मुस्ताक हाजी उस्मान शेख, फारुख सांगलीकर, हाजी फिरोज बागवान, आबिद शेख, आरिफ सय्यद आदीनी केले. सुत्रसंचलन संजय बारवकर यांनी केले तर आभार अबिद शेख शेख यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top