शिरूर / प्रतिनिधी : किरण चौधरी
शिरूर शहरातील हनुमाननगर मित्र मंडळामध्ये नवरात्रोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी नवरात्र उत्सावामध्ये सर्व माता भगिनी घट स्थापनेपासून नऊ दिवस अतिशय उत्साहात सर्व कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतात. यंदाही हनुमान नगर मित्र मंडळाने लहान मुलांसाठी स्पर्धा, जादूगार भुजंग यांचा जादूचा कार्यक्रम, महिलांसाठी दांडिया गरबा तसेच विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम मंडळाच्या वतीने घेण्यात आले होते विशेष बाब म्हणजे या सर्व कार्यक्रमांचे नियोजन हे सर्व महिला करत असतात. नगरसेवक निलेशशेठ लटांबळे, उद्योजक भाऊसाहेब हारदे, युवा उद्योजक भूषण मुत्याल, पैलवान राजेंद्र भोसले,अमृत भवर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे आधारस्तंभ उद्योजक भाऊसाहेब हारदे, विद्यमान नगरसेवक अभिजीत गणेश तात्या पाचर्णे, मा. नगरसेवक निलेशशेठ लटांबळे मंडळाचे पदधिकारी प्रशांत पवार सर, मोहन पडवळ, अविनाशशेठ नगरे,विकासशेठ नागरगोजे, अक्षयशेठ भवर, सिद्धांत शेळके, वसीम शेख, स्वप्निल तरटे, सचिन पवार सर, डॉ.तुषार राऊत विश्वजीत घुमरे, स्वप्निल हारदे, मोहन टेकाळे, विशाल अलभर, मयुरेश औटी यांसह सर्व महिला मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद