पाटोदा / प्रतिनिधी : गणेश शेवाळे
आष्टी मतदार संघातील पाटोदा तालुक्यात राजकीय घडामोडीत केंद्र बिंदू असणारे डोगरकिंन्ही जिल्हा परिषद गटाचा निकाल ठरवणारे नेहमी काहीना काही कारणाने चर्चेत असणारे गाव म्हणजे काकडहिरा या काकडहिरा गावातील सरपंच, उपसरपंच यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामपंचायत सदस्य यांनी परळी नगरपरिषदचे गट नेते वाल्मिक आण्णा कराड यांची भेट घेऊन महाराष्ट्र राज्याचे नेते पालकमंत्री ना. धनंजय मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे सोबत राहुन काम करू असा शब्द दिला.
यावेळी काकडहिरा गावातील विविध प्रश्नांवर चर्चा करून गटनेते वाल्मिक आण्णा कराड यांचा सत्कार करताना सरपंच संजय जायभाये, उपसरपंच बाबासाहेब जायभाये, महादेव जायभाये, अशोक जायभाये, सोमिनाथ जायभाये, बळीराम जायभाये, कृष्णा जायभाये, अशोक आघाव, विष्णू जायभाये, युवा नेते संदिप तांदळे यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद