श्री. मुलिका देवी विद्यालयाचे शालेय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश

0



पारनेर -( निघोज ) / प्रतिनिधी सागर आतकर

                    पारनेर तालुक्यातील निघोज येथील श्री मुलिका देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून चुणूक दाखवली आहे.

नुकत्याच झालेल्या मैदानी क्रिडा स्पर्धेत मुलींच्या १९ वर्षे वयोगटातील कुमारी तृप्ती बाळू भोर १५०० मिटर धावणे द्वितीय, १५०० मिटर धावणे व्दितीय मयुरी संदीप सोनवणे, अस्मिता शिवराज सालके ४०० मिटर धावणे व्दितीय व तृप्ती बाळू भोर १०० मिटर धावणे प्रथम क्रमांक पटकाविला असून जिल्हा पातळीवर निवड झाली आहे.

नुकत्याच पारनेर येथे मैदानी क्रिडा स्पर्धेत मुलांच्या १४ वर्षे वयोगटातील तन्मय देविदास पांढरकर, वेदांत बाबाजी लाळगे, आर्यन अशोक मंडले, हर्षद ज्ञानेश्वर श्रीमंदिलकर, सुयश विश्वनाथ भुकन या विद्यार्थ्यांनी ४ x १०० मिटर रिले या क्रिडा प्रकारात पारनेर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला व त्यांची जिल्हा पातळीवर निवड झाली आहे.

मुलींच्या १४ वर्ष वयोगटात ४ x १०० मिटर रिलेमध्ये श्रेया अशोक लाळगे, स्नेहल रविंद्र पांढरकर, सई संतोष पंदारे, स्मिता राहुल सोनवणे, तनया पोपट जगदाळे या विद्यार्थींनी प्रथम क्रमांक मिळवल्याने जिल्हा पातळीवर निवड झाली आहे.

मुलींच्या १९ वर्षे वयोगटामध्ये ४ x ४०० मिटर रिले मध्ये अस्मिता शिवराज सालके, तृप्ती बाळू भोर, आकांक्षा सुनिल खोसे, ईश्वरी अनिल वालझाडे, प्रतिक्षा संतोष सोनवणे या विद्यार्थीं नी तालुका पातळीवर प्रथम क्रमांक मिळविल्याने जिल्हा पातळीवर निवड झाली आहे.

या सर्व यशस्वी खेळाडूंना क्रिडा शिक्षक बी  एफ शिंदे व क्रिडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य के. बी शिंदे सर्व शिक्षक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top