साथीच्या आजारांचे पाटोदयात थैमान गणराया नगरपंचायतला फवारणी करण्याची सद्बुद्धी दे- निलाताई पोकळे

0

पाटोदा /  प्रतिनिधी गणेश शेवाळे 

                गेल्या काही दिवसात पाटोदा तालुक्यातील वातावरण अत्यंत खराब झाले असुन तालुक्यातील नागरिक चांगलेच हैराण झाले आहे. पाटोदा शहरातील रुग्णालयात व इतर आरोग्य केंद्रात डेंग्यू, मलेरिया व इतर साथीच्या रोगांचे रुग्ण आढळून येत आहेत. ही संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे भारतीय राष्ट्र समितीच्या नेत्या निलाताई पोकळे यांनी आरोग्य विभाग व पाटोदा नगरपंचायतला खबरदारीच्या उपाययोजना करण्याबाबत आव्हान केले आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या काही दिवसांत कुठे पाऊस झाला तर कुठे नाही यामुळे प्रचंड  मच्छरांचा सुळसुळाट झाला असून दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यात डेंगू, मलेरिया इतर साथीच्या आजाराने डोके काढले असल्याने पाटोदा ग्रामीण रुग्णालयात व इतर हाॅस्पिटल मध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे आरोग्य विभाग व पाटोदा नगरपंचायतने तातडीने आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात तसेच रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच पाटोदा शहरात नगरपंचायतने डास रोधक व जंतूनाशकांच्या फवारण्या कराव्यात तसेच साथीचे आजार थांबवण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना व जनजागृती करावी अशी मागणी भारतीयराष्ट्र समितीच्या नेत्या निलाताई पोकळे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top