पारंपारीक वाद्यांच्या गजरात उत्साही व मंगलमय वातावरणात गणरायांचे आगमण

0



शिरूर / प्रतिनिधी- किरण चौधरी

        शिरूरला पारंपारीक वाद्यांच्या गजरात "गणपती बाप्पा मोरया,मंगलमुर्ती मोरया"चा जयघोष करत मोठ्या उत्साही व मंगलमय वातावरणात गणरायांचे आगमण झाले.

सकाळपासुनच गणरायांच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा मुहुर्तावर करण्यासाठी सर्वत्र लगबग पहावयास मिळत होती. शहरात लहान-मोठे ४७ तर शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत १३० असे १७७ गणेश मंडळे असुन सकाळपासुनच बाप्पांना आणण्यासाठी बाजर पेठांमध्ये गर्दी पहावयास मिळत असल्याने बाजार पेठ गर्दीने फुलून गेली होती.

मानाच्या पहिल्या राम मंदिराच्या श्रींच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा दुपारी १२.३० वाजता झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षिरसागर, राजेश बोत्रे, साकेत गुजर उपस्थित होते. मानाच्या दुसरा शिवसेवा मंडळ, तिसरा मारूती आळी व चाैथा कुंभार आळीसह शहरातील सुभाष चाैक, हलवाई चाैक, सरदारपेठ, भाजीबाजार, सोनार आळी, आडत बाजार, कापड बाजार, बुरूड आळी, जय बजरंग मित्र मंडळ जोशिवाडी, अजिंक्य तारा, कामाठीपुरा, मुंबई बाजारच्या हनुमान मंडळ, डंबेनाला, लाटेआळी, रेव्हेन्यु काॅलनी, गोपाल गणेश मंडळ, हनुमाननगर मित्र मंडळ, करंजुले वस्ती, हुडको वसाहत आदिंसह इतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या श्रींचे आगमन दुपारी व संध्याकाळनंतर तर बहुतेक घरगुती गणरायांचे आगमन दुपारीच झाले होते.

सगळीकडे "गणपत्ती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया"चा जयघोष सुरू होता. शहरातील शाळांनी ढोल-ताशाच्या गजरात शहरातुन मिरवणुक काढुन मोठ्या उत्साही व मंगलमय वातावरणात बाप्पांची प्रतिष्ठापणा करण्यात आली.

सकाळपासुनच गणरायांच्या पुजेसाठीेचे साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाल्याने विक्रेत्यांची धांदल उडाल्याचे पहावयास मिळत होती. डि.जे.डाॅल्बीवर बंदी असल्याने सनई ताफा, ढोल-ताशा पथक आदिंसह पारंपारीक वाद्यांना सुगीचे दिवस आल्याचे दिसुन येत होते. शिरूरचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top