‘त्या’ कामाचे खासदारांनी श्रेय घेऊ नये; कळमकर

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज | पारनेर

पारनेर बसस्थानकाची आता नवीन सुसज्ज इमारत उभी राहणार आहे. या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे आ. काशिनाथ दाते यांनी केली होती. कळमकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आ. दाते यांच्या मागणीची दखल घेऊन पारनेर बस स्थानकाच्या नवीन इमारतीसाठी २ कोटी ६६ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी देउन राज्य परिवहन महामंडळाकडून ही निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. पारनेर बसस्थानक इमारत बांधकाम भूमिपूजनाचा महाविकास आघाडीच्या खासदार यांनी घाट घातला असून, या इमारत भूमिपूजनाचा अधिकार खासदारांना नाही. ज्या कामांशी काडीमात्र संबंध नाही, अशा कामांचे श्रेय घेण्याचा खासदारांचा सुरू असलेला प्रयत्न लाजिरवाणा आहे. त्यांच्याकडून असा पोरकटपणा कायम केला जातो, हे गेल्या पाच वर्षापासून मतदारसंघातील जनता पाहत आहे.

केंद्रातील व राज्यातील महायुतीचे मंत्री आणि नेत्यांसोबत फोटो काढायचे स्वतःचे कौतुक करून घ्यायचे आणि मी कसा पाठपुरावा केला, हे सोशल मीडियातून दाखवायची पद्धत पारनेर नगर मतदारसंघातील जनतेच्या आता लक्षात आली आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर यांनी खा. नीलेश लंके यांचे नाव न घेता केला आहे.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top