कर भरा, जप्ती टाळा : बबन काळे

0

महाराष्ट्र दर्शन न्यूज | अहिल्यानगर

        हिल्यानगर महापालिका हद्दीतील नागरिकांनी चालू व थकीत कर तातडीने भरून जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन सावेडी प्रभाग अधिकारी बबन काळे यांनी केले आहे. महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कारवाई सुरु आहे. त्यानुसार बालिकाश्रम रस्त्यावरील फकीर मोहम्मद नूर मोहम्मद बागवान यांच्यासह इतर मालकीचे चार गाळे सील करण्यात आले आहे. तर चार नळ कनेक्शन तोडण्यात आले आहे.  


काळे यांचे आवाहन

तीन लाख ३५ हजार रुपयांचा कर थकीत आहे. ही कारवाई महापालिका कर निरीक्षक ऋषिकेश लखपती, नंदा भिंगारदिवे, अजय कांबळे, संजय तारडे, संदीप कोलते, किशोर जाधव, सागर जाधव, मंजाबापू लहारे, किशोर देठे, गोरख ठुबे, राजेश आनंद, रफिक देशमुख आदी उपस्थित होते. आयुक्त डांगे यांनी करावर लावलेली शास्ती १०० टक्के माफ केले. १५ तारखेच्या आत सर्व करदात्यांनी आपला कर भरून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रभाग अधिकारी बबन काळे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top