महाराष्ट्र दर्शन न्यूज | पारनेर| प्रतिनिधी- सागर आतकर
अखिल भारतीय पत्रकार संघ पारनेर तालुका अध्यक्षपदी राळेगण थेरपाळ येथील दैनिक सह्याद्री या लोकप्रिय वृत्तपत्राचे पत्रकार जयदिप शामराव कारखिले यांची तालुकाध्यक्ष तसेच अळकुटी येथील दैनिक दिव्य मराठी व दैनिक पुढारी या लोकप्रिय वृत्तपत्राचे पत्रकार मंगेश भानुदास पारखे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष सतिष रासकर हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. रासकर तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक व पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्तात्रय उनवणे यांच्या हस्ते कारखिले व पारखे यांना त्यांच्या निवडीचे पत्र देण्यात आले.
लवकरच उर्वरित कार्यकारिणी कारखिले व पारखे जाहीर करणार आहेत. यावेळी राज्य पत्रकार संघाने पत्रकार रामचंद्र महाराज सुपेकर, पत्रकार सलीमभाई हवालदार, पत्रकार ॲड.सोमनाथ गोपाळे यांना सन्मानचिन्ह व शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल या पाच मान्यवरांचा सत्कार अखिल भारतीय पत्रकार महासंघ वतीने पारनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबाजी वाघमारे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष भास्करराव कवाद, लोणीमावळा येथील दैनिक लोकमत प्रतिनिधी पत्रकार विकास शेंडकर, ज्येष्ठ मार्गदर्शक अविनाश भांबरे, दैनिक वरुड केसरी पत्रकार संपतराव वैरागर, पत्रकार आनंद भुकन, दैनिक प्रभातचे पत्रकार योगेश खाडे, दैनिक पारनेर दर्शनचे पत्रकार संदीप ईधाटे, दै राष्ट्र सह्याद्रीचे पत्रकार नितीन परंडवाल, दैनिक जनलोकचे रोहन उनवणे आदिंच्या हस्ते करण्यात आला.
शरदचंद्रजी पवार अभ्यासिका ईमारत मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट सभागृहात झालेल्या या बैठकीत हा कार्यक्रम व अखिल भारतीय पत्रकार महासंघ पारनेर तालुका ही पहिलीच बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. निघोज व अळकुटी जिल्हा परिषद गटातील पंचवीस पत्रकार या अखिल भारतीय पत्रकार महासंघ पारनेर तालुका या पत्रकार संघाचे सभासद झाले आहेत.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद