Leopard पाण्याच्या टाकीत पडलेला बिबट्या रेस्क्यू ऑपरेशन करत पकडला

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज / राहुरी 

नागरिकांना अनेक वेळा बिबट्याचे दर्शन

राहुरी फॅक्टरी येथील सूर्यानगर, इंजीनियरिंग कॉलेज, गीते वस्ती व तनपुरे कारखाना परिसरात नेहमीच या बिबट्याचा वावर बघण्यास मिळत असत. या बिबट्याने येथील नागरिकांना देखील अनेक वेळा दर्शन दिले होते. त्याने परिसरातील अनेक शेळ्या, कोंबड्या फस्त केल्या होत्या त्यामुळे नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत होती. आज (ता.२३) दुपारी येथील इंजीनियरिंग कॉलेज परिसरातील पाण्याच्या टाकीत बिबट्या पडलेला दिसताच स्थानिक नागरिकांनी वनविभागास कळविले. त्यानंतर वनविभागाची रेस्क्यू टीम तसेच देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अग्निशामक टीमला पाचरण केले. बिबट्या हा दोन पाण्याच्या टाकींना जोडणाऱ्या पाईपमध्ये अडकला असता वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन करत बोगद्याच्या ठिकाणी पिंजरा लावला. त्यानंतर टीमच्या दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. 

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी युवराज पाचारणे मार्गदर्शनाखाली गणेश मिसाळ, राजू रायकर, गिरी, शेंडगे, ताराचंद गायकवाड, कृष्णा पोपळघट, तसेच वनविभाग रेन स्टॉप विभाग, देवळाली प्रवरा नगरपालिका मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्यासह भारत साळुंके व कर्मचारी तसेच देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी ऋषभ लोढा, सचिन सरोदे, मंगेश ढुस, बाळासाहेब पडागळे, निखिल गोपाळे, दत्तात्रय साळुंके, विलास पवळ, आशु सांगळे आदिंसह नागरीक उपस्थित होते. पकडलेल्या बिबट्या पाहण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top