महाराष्ट्र दर्शन न्यूज / निघोज / प्रतिनिधी - सागर आतकर
पारनेर तालुक्यातील निघोज येथील विविध रस्त्यांचे प्रश्न शिवबा संघटनेच्या वतीने पारनेर तालुक्याचे आमदार काशिनाथ दाते यांची भेट घेऊन मांडण्यात आला.
वेताळबाबा स्टेडियम मार्गे वडनेर रोडला जोडणारा रस्ता त्याचप्रमाणे वरखडे वस्ती, दत्त मंदिर ते दर्याचा मळा, शिवडी येथील शिरोळे वस्ती व शेटे वस्तीकडे जाणारा रस्ता मुकामळा या ठिकाणी नदीवरील पूल बांधण्या संदर्भातला प्रश्न बाजारतळ ते डोंगरमळा या ठिकाणी जाणारा रस्ता या सर्व रस्त्यांच्या बाबतीत आमदार दाते यांना या भागातील ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या अडचणी शिवबा संघटनेच्या माध्यमातून सांगण्यात आल्या.
त्या बाबतीत आमदार साहेबांनी अतिशय सकारात्मक अशी भूमिका घेत हे सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी निवेदन देण्यासाठी शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे, शिवबा संघटना उपतालुकाप्रमुख रोहिदास लामखडे उपस्थित होते. निवेदनावर शंकर वरखडे, निलेश वरखडे, शैलेश ढवळे, शांताराम लामखडे, नवनाथ लामखडे, संतोष लामखडे, अविनाश लामखडे, रामदास शेटे, ज्ञानेश्वर शेटे, वरखडे बाबाजी, लामखडे तानाजी, खंडू लामखडे, पांडा लामखडे, गोरख भोसले, गोरख लामखडे, अविनाश लामखडे आदी सहकाऱ्यांच्या सह्या आहेत.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद