प्रा. मनिषा गाडीलकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच्.डी. डॉक्टरेट पदवी प्रदान

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज / निघोज / प्रतिनिधी - सागर आतकर

        पारनेर तालुक्यातील निघोज येथील श्री. मुलिकादेवी महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्रा. मनिषा रामचंद्र गाडीलकर यांनी हिंदी विषयातून 'डॉ. सुरेश शुक्ल चंद्र के नाटको मे अंकित मूल संवेदना' या विषयावर आपले पीएच्.डी. चे शोधकार्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास सादर केले. त्यांच्या या बहुमोल शोधकार्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना पीएच्.डी. (विद्यावाचस्पती) ही पदवी प्रदान केली आहे. 

यासाठी त्यांना चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे हिंदी विभाग तथा संशोधन केंद्रप्रमुख डॉ. ईश्वर पवार यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल श्री. मुलिकादेवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर, उपप्राचार्य डॉ. मनोहर एरंडे, प्राध्यापक जाधव, प्राध्यापक पाटेकर, प्रा. कवडे व त्यांचे सर्व सहकारी तसेच अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच पारनेर तालुका पत्रकार संघ, पारनेर तालुका मराठी पत्रकार संघ, पत्रकार संघ विभागीय कार्यालय निघोज व निघोज ग्रामस्थ यांनी प्रा. डॉ. मनिषा गाडीलकर यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top