निधन वार्ता : दूध व्यवसायातील शेतकऱ्यांना पाठबळ देणारा एक आदर्श व्यक्तिमत्व हरपले

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज / निघोज

                निघोज येथील कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कार्याध्यक्ष तसेच श्री.स्वामी समर्थ सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष शांताराम मामा लंके यांचे आज पहाटे (दि.४) रोजी वयाच्या ७८ व्या वर्षी ऋदयविकाराच्या तिव्र धक्याने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज शनिवार रोजी दि.४ जानेवारी दुपारी तीन वाजता निघोज येथील स्मशानभूमीत होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली, भाऊ, भावजयी, पुतणे, सुना, नातू नाती असा मोठा परिवार आहे. कन्हैया दूध उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्रशेठ लंके यांचे वडील तसेच जी एस महानगर बॅंकेचे संचालक बबनशेठ लंके यांचे ते मोठे बंधू होत. अत्यंत साधी राहाणी असणारे एक प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून लंके मामा परिचीत होते. अत्यंत साधी राहाणी असणारे एक प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून लंके मामा परिचीत होते. गेली पन्नास वर्षांपूर्वी त्यांनी शेती क्षेत्रात कार्यरत राहून एक प्रगतीशील शेतकरी होण्याचा मान मिळवला. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी गेली वीस वर्षात महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. लंके मामा यांचे गाव विकासासाठी त्यांचे फार मोठे योगदान आहे. शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक क्षेत्रात ते सातत्याने कार्यरत होते. गोरगरीब समाजाला साथ देणारे लंके मामा यांच्या निधनामुळे फार मोठी उणीव जाणवणार आहे. दूध व्यवसायातील शेतकऱ्यांना पाठबळ देणारा एक आदर्श व्यक्तिमत्व हरपले असल्याची प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे. महाराष्ट्र दर्शन न्यूज परिवारकडून शांताराम मामा लंके यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

निघोज गाव बंद ठेऊन वाहिली श्रद्धांजली

कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शांताराम मामा लंके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आज निघोज गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top