महाराष्ट्र दर्शन न्यूज / ब्युटी टिप्स:
'व्हिटॅमिन सी'ची कमतरता
अकाली पांढरे केस होण्याचे प्रमुख कारण म्हणजे शरीरातील 'व्हिटॅमिन सी' ची कमतरता. 'व्हिटॅमिन सी' मुळे कोलेजन तयार होते. जे केसांना मजबूत बनवण्याबरोबरच त्यांना पांढरे होण्यापासून रोखते. तसेच यामुळे केस गळती, कोरडेपणा आणि इतर समस्या कमी होतात. 'व्हिटॅमिन सी'ची कमतरता असलेल्या लोकांमध्ये केस पांढरे होण्याची शक्यता अधिक असते.
'व्हिटॅमिन सी'ची कमतरता कशी टाळायची ?
'व्हिटॅमिन सी' सहज उपलब्ध असणाऱ्या फळे आणि भाज्यांमध्ये आढळते. जर तुम्ही दररोज सुमारे 4 ग्रॅम 'व्हिटॅमिन सी'चा समावेश आहारात केला, तर डोक्यामधील रक्त परिसंचरण सुधारेल ज्यामुळे केसांच्या समस्या कमी होण्यास मदत होईल.
कोणते पदार्थ खावे?
'व्हिटॅमिन सी'साठी संत्री, पेरू, द्राक्षे, ब्लॅकबेरी आणि पपई खाणे फायदेशीर ठरते. भाज्यांमध्ये ब्रोकोली, पालक, टोमॅटो आणि कोबी यांचा समावेश करावा. हे पदार्थ नियमित आहारात असतील तर केसांना पोषण मिळेल आणि केस पांढरे होण्याची प्रक्रिया थांबेल.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद