महाराष्ट्र दर्शन न्यूज / निघोज (ता. पारनेर) / प्रतिनिधी- सागर आतकर
पारनेर तालुक्यातील निघोज येथील ज्ञानोदय स्टडी सेंटरच्या विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यशाची परंपरा कायम राखली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील 'ज्ञानोदय स्टडी सेंटर'ने १० वी बोर्ड परीक्षा २०२६ मध्ये आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. संपूर्ण डिजिटल शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या या केंद्रातील विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.
यंदाच्या परीक्षेत ज्ञानोदय स्टडी सेंटरची विद्यार्थिनी देवयानी मंगेश लंके हिने ९४.४०% गुण मिळवले आहे. त्यासोबतच वेदांत भास्कर काकडे आणि किरण भरत लंके या दोघांनीही ९३.६०% गुण मिळवून श्री मुलीकदेवी शाळा, निघोज येथे प्रथम क्रमांक पटकवला आहे.
इतर यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये वैष्णवी संतोष घोगरे (९२.८०%), सई संतोष पंदारे (९२.६०%) आणि निहारिका नवनाथ शेटे (९१.६०%) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, केंद्रातील १० हून अधिक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुणांची कमाई केली आहे.
केंद्राचे वैशिष्ट्य:
निघोज येथील श्री साई स्टेशनरीच्या मागे असलेले हे केंद्र इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या मराठी, सेमी-इंग्रजी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीने मार्गदर्शन करते.
या यशात, न्यू इंग्लिश स्कूल, घोडोबाफाटा. श्री मुलिकादेवी विद्या मंदिर आणि न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, वडनेर बु. या शाळांमधील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. संस्थेने नवीन शैक्षणिक वर्षासाठी 'प्रवेश सुरू' असल्याची घोषणा केली असून, इच्छुक पालकांनी ९६८९३५२३५४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.


.gif)
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद