महाराष्ट्र दर्शन न्युज / पारनेर:
सोशल मीडियावर महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील एका डॉक्टराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजन नायक कांशीरामजी यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याचा आरोप संबंधित डॉक्टरवर आहे. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त कार्यकर्त्यांनी या डॉक्टरच्या तोंडाला शाई फासली आणि चपलांचा हार घालून आपला रोष व्यक्त केला. या प्रकारामुळे परिसरात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाळवणी येथील डॉ. मंगेश बेकारसे याने आपल्या सोशल मीडिया खात्यावरून एक वादग्रस्त पोस्ट प्रसिद्ध केली होती. ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या.
या कृत्याचा निषेध करण्यासाठी आज मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाळवणी येथे एकत्र आले. त्यांनी संबंधित डॉक्टरला गाठून या प्रकाराचा जाब विचारला. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी डॉक्टरच्या तोंडावर शाई फेकली आणि गळ्यात चपलांचा हार घालत घोषणाबाजी केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे. महापुरुषांचा अवमान करणाऱ्या या डॉक्टरवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करावी, अशी मागणी आता स्थानिक संघटना आणि नागरिकांकडून केली जात आहे.


.gif)
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद