निघोजमध्ये रंगणार महाबली कुस्तीचा फड

0
  पारनेर तालुक्यातील निघोज येथे १३ फेब्रुवारी व १४ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय महाबली कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती पैलवान हनुमंत भोसले व पैलवान सुभाष वराळ यांनी दिली आहे.पारनेर तालुक्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून लाखो रुपयांची बक्षिसे या स्पर्धेदरम्यान दिली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये ४२ किलो, ५० किलो, ५७ किलो, ६५ किलो, ७४ किलो, ८६ किलो व खुल्या गटातील कुस्ती स्पर्धा होणार असून यात प्रत्येकी वजन गटातील तीन स्पर्धकांना बक्षीस देण्यात येणार आहे. 

या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी एक लाख रुपये व चांदीची गदा अशी बक्षिसे ठेवण्यात आलेली आहे. तर १४ फेब्रुवारी रोजी या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे बक्षीस वितरण भारत केसरी रोहित पटेल आंतरराष्ट्रीय कुस्ती खेळाडू उत्कर्ष काळे हिंदकेसरी अमोल बुचडे सम्राट अस्लम काझी महाराष्ट्र केसरी हर्षल सदगीर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे तालीम संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव लांडगे यांच्या हस्ते केले जाणार आहे. एस कुस्ती स्पर्धे दरम्यान येथील महा निवेदक शंकरआण्णा पुजारी हेही निवेदक म्हणून राहणार असून या कुस्त्यांचे थेट प्रक्षेपण पाण्याचे व्यवस्थापन या आयोजन समितीने कुस्ती शौकिनांसाठी केली आहे. तरी प्रथमच तालुक्यात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा पैलवानांनी लाभ घ्यावा व यामध्ये सामील व्हावे असे आव्हान पैलवान हनुमंत भोसले, सुभाष वराळ, अमोल लंके, अर्जुन लामखडे, जयदीप सालके यांनी केले आहे.या कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्यारा प्रत्येक पराजीत पैलवानांना देखील ईनाम दिला जाईल असे संयोजन समितीच्या वतीने माहिती दिली आहे. तर महाराष्ट्र राज्यातून या स्पर्धेमध्ये सहभागी होणार्‍या पैलवानसाठी राहण्याची व जेवण्याची व्यवस्था पैलवान प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात येणार आहे.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top