मालवण येथील चिवला बीचवर निसर्ग सौंदर्याच्या सानिध्यात भरली वाळू शिल्पकार्य शाळा

0
प्रतिनिधी / पारनेर
08/02/2020
४१ व्या राज्यस्तरीय कला शिक्षण परिषदेमध्ये वाळू शिल्पामध्ये साकारली चांदबिबी महालाची प्रतिकृती सिंधुदुर्ग जिल्हा मालवण या ठिकाणी ४१ वी राज्यस्तरीय शिक्षण परिषद संपन्न झाली या कला शिक्षण परिषदेमध्येे कला शिक्षणाबद्दल चित्र-शिल्प,नृत्य-नाटय,गायन-वादन  विविध विषयांवर कार्यशाळा दि. ६ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी मध्ये संपन्न झाली यानिमित्तानं महाराष्ट्र राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यातील जवळजवळ एक हजार कलाशिक्षकांनी मालवण कला परीषदेसाठी सहभाग नोंदवला आणि या विविध ललित कला कार्यशाळांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला.


        या निमित्ताने मालवण येथील चिवला बीचवर निसर्ग सौंदर्याच्या सानिध्यात वाळू शिल्पकार्यशाळा प्रसिद्ध वाळू शिल्पकार समीर चांदोरकर यांच्या मार्गदर्शना खाली पार पडली. अहमदनगर जिल्हयाच्या वतीने कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे, अविनाश नेहूल, गणेश सरोदे, किशोर जगताप, बाबा भोर, साबळे सर, आटपाडकर यांनी अतिशय सुंदर अशी चांदबिबी महाल वाळुशिल्पा कृती सादर केली त्या निमित्ताने या कला शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top