विद्यार्थ्यांनी सुज्ञ नागरिकाला सुप्त वाव ज्ञानाच्या माध्यमातून दिला तर यश मिळवता येते - राजेश गवळी(पोलिस निरीक्षक)

0
श्री.मुलिकादेवी महाविद्यालयात स्पर्धा परिक्षा केंद्र व प्रसिद्धी विभागद्वारे विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पोलिस उपनिरीक्षक मा.विजयकुमार बोञे, मा.अशोक निकम, जेष्ठ पञकार दत्ताजी उनवणे, श्री.दत्ता गाडगे, मा. संजयजी बारहाते यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सहदेव आहेर होते. विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्ती बाळगणे आवश्यक असून ज्ञानाचा उपयोग व विद्वतेचा उपयोग कसा करावा हे जर ठरवले तर यशस्वी होऊन पुढे जाता येते. समाजातील दुख व जाणीवा व्यक्त होण्यासाठी पञकार आपले कार्य समाजापुढे मांडण्याचे कार्य करतात व  ज्ञान देतात या ज्ञानाचा उपयोग माणुस म्हणून स्वताला शोधण्यासाठी होतो. विद्यार्थ्यांनी सुज्ञ नागरिकाला सुप्त वाव ज्ञानाच्या माध्यमातून दिला तर यश मिळवता येते असे पोलिस निरीक्षक राजेश गवळी म्हणाले.
जेष्ठ पञकार दत्ताजी उनवणे म्हणाले की,राजेश गवळी यांचे कार्य उल्लेखनीय असून त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा.चांगले व्यक्तिमत्व घडण्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत वाचन करावे
असे सांगितले.
प्रमाणिक प्रयत्न केल्यास यश मिळते.आयुष्यात प्रत्येकाने ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल करावी. विद्यार्थ्यांनी स्वतामध्ये असणारी भिती दूर केली तर आत्मविश्वास प्राप्त होतो असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर म्हणाले.

यावेळी भास्करजी कवाद, गिरीष शेलार, आनंदा भुकन, सागर आतकर, विजय रासकर हे पञकार बांधव उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.मनोहर एरंडे, प्रसिद्धी समितीचे अध्यक्ष डॉ. गोविंद देशमुख, प्रा.विशाल रोकडे, प्रा. मनिषा गाडिलकर, प्रा. पोपट सुंबरे, प्रा. प्रिती कार्ले, प्रा.निलिमा घुले, प्रा.संगिता मांडगे, प्रा.सचिन निघुट, प्रा. सुरेश गाडिलकर, प्रा.अंजली मेहेर, प्रा.दिपाली जगदाळे, प्रा.अशोक कवडे, प्रा. राणी ढगे, प्रा.अक्षय अडसुळ, प्रा.राम खोडदे, प्रा. विशाल चव्हान, प्रा.जनाबाई घेमुड, प्रा.शहाजी पांढरे, प्रा.सचिन निघुट, प्रा.पोपट पठारे, प्रा. सचिन लंके, प्रा.प्रतिभा शेळके, प्रा.शामराव रोकडे, प्रा.केशर झावरे, प्रा.प्रविण जाधव, प्रा. स्वाती मोरे, प्रा. सोनाली बेलोटे, प्रा.अनुजा भांबरे, कार्यालयीन अधिक्षक नवनाथ घोगरे, संदिपजी लंके, श्री दिगेश पवार,अक्षय घेमुड, किशोर बाबर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक उपप्राचार्य डॉ.मनोहर एरंडे यांनी केले.सुञसंचालन प्रा.आनंद पाटेकर व प्रा. मनिषा गाडिलकर यांनी  तर आभार डॉ.गोविंद देशमुख यांनी मांडले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top