पारनेर / प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे वादातून महिलेवर गोळ्या झाडत तिची हत्या करण्यात आली. यामध्ये सविता सुनील गायकवाड (वय 35) यांचा मृत्यू झाला.ही घटना सोमवारी रात्री दहाच्या सुमारास वडझिर येथे घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

रात्री पावणे दहाच्या सुमारास काही युवकांनी येऊन सविता गायकवाड यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादातच एका तरुणाने स्वतः कडील पिस्तूल काढून सविता गायकवाड यांच्यावर गोळीबार केला.गायकवाड यांच्या मुलीने आरडाओरडा केल्याने गुन्हेगारांनी तेथून पलायन केले.गुन्हेगारांनी पिस्तूल मधून तीन गोळ्या झाडल्या त्यातील एक मानेवर,दुसरी गोळी हाताच्या पंजाला तर तिसरी गोळी कानाजवळ घुसल्या.गायकवाड यांच्या मुलीने आरडाओरडा केल्याने ग्रामस्थ जमा झाले व त्यांनी परिस्थिति पाहून गायकवाड यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पाठवले असतानाच त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला.दरम्यान गायकवाड यांचा मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता . या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना केले आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद