छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार काळाची गरज- वसंत कवाद

0
           विद्याधन कोचिंग क्लासेस मध्ये आज शिवजयंती व इ. 10 वी विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यकर्माचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी  निघोज नागरी पतसंस्थेचे चेअरमन वसंतराव कवाद बोलत होते. 
 विद्यार्थ्यांनी यश मिळविण्यासाठी शिवाजी महाराजांच्या विचारांचे आचरण केले पाहिजे. संस्कार, संस्कृती टिकवणे ही अभ्यासाबरोबर काळाची गरज आहे.छञपती शिवाजी महाराजांचे विचाराच आपल्या देशाला सुजलाम सफलाम बनवु  शकतात.

      मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर म्हणाले,विदयाधन क्लासचे संचालक प्रा.ज्ञानेश्वर कवाद शिवव्याख्याते असल्यामुळे त्यांचे  आचार ,विचार व उच्च दर्जाचे वक्तृत्व हे विदयाथ्यौंमध्ये असल्याचे पाहण्याचा योग आज समोरासमोर आला.
     सरपंच ठकाराम लंके यांनी बोलतानी सांगितले , विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देवुन उच्च अधिकारी होण्याचे स्वप्न पाहावे.
      यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग पाटील लंके होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सरपंच ठकाराम लंके,मळगंगा ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर, हिंदवी शिक्षण संस्थेचे सचिव शिवाजीराव  वराळ,पोलिस दुरक्षेञ निघोज हेडकाॕन्सटेबल अशोक निकम ,सेवानिवृत्त मुख्याध्यापक भिमाजी शेटे,कुरुंद अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव शेटे,पोस्टाचे वरिष्ठ अधिकारी दिलीपराव उनवणे,शिवबा संघटनेचे अनिल शेटे, विष्णु लंके,मळगंगा ट्रस्टचे  विश्वस्त बबनराव ससाणे, विश्वासराव शेटे,संकेत लाळगे,डाॕ.विजय कवाद,पञकार भास्करराव कवाद, विजयराव  वराळ,एन टि.व्ही.चे  सागर अातकर, विकास लंके,चंद्रकांत उचाळे,हाैशिराम शेटे, योगेश साबळे, संतोष रसाळ, श्रीकांत लामखडे ,निलेश लामखडे , विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
      कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्लासचे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.क्लासमधील ५१ विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
      कार्यक्रमाचे प्रास्तविक विदयाधन क्लासचे संचालक प्रा.ज्ञानेश्वर कवाद यांनी सुत्रसंचालन साक्षी भुकन व प्रगती लामखडे यांनी तर आभार संकेत लाळगे यांनी मानले.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top