पाणीदार पिंपरी जलसेनच्या विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही - उज्वला ठुबे

0
पिंपरी जलसेन । न्युज महाराष्ट्र दर्शन
         स्व. सॉ गुलाबराव शेळकेंच्या स्वप्नातील पाणीदार गाव उदय शेळकेंनी सत्यात साकारले असून पिंपरी जलसेनच्या विविध विकास कामांसाठी जिल्हा परिषदेच्या मार्फत भरपूर निधी देणार असून विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही जिल्हा परिषद सदस्या उज्वलताई आझाद ठुबे यांनी पिंपरी जलसेन येथे दिली.


        पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे ६६.६८ लक्ष रुपये खर्चाच्या राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत नळपणीपुरावठा योजना, जलशुद्धीकरण प्रकल्प, स्मशानभूमी सुशोभीकरण व यमाई मंदिर(शेळके मळा) या कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्या उज्वलताई ठुबे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीएस महानगर बँकेचे अध्यक्ष ऍड उदय शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य ऍड आझाद ठुबे, पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, जी एस महानगर बँकेचे संचालक संतोष रणदिवे, पिंपरी चे सरपंच शेउबाई घेमुड, गांजिभोयरे सेवा संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब खोडदे, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता पी.पी. पंडित, ग्रामसेवक सुनील दुधाडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
      उज्वला ठुबे बोलताना म्हणाल्या की, आम्ही गट-तटाचे राजकारण कधी केले नाही आणि करणार नाही. स्थानिक राजकारण कधीच विकास कामे करत असताना मध्ये आणले नाही. ग्रामस्थांनी गावच्या विकासासाठी एकत्र येणे गरजेचे असून गावच्या विकासासाठी भरपूर निधी देऊ असे आश्वासन उज्वलताई ठुबे यांनी केले.  माजी जि.प. सदस्य ऍड आझाद ठुबे बोलताना म्हणाले की, राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम उच्च प्रतीचे करून तळागाळातील नागरिकांना पाणी पोहचले पाहिजे आशा सूचना कंत्राटदार यांना ठुबे यांनी दिल्या. यापूर्वी जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी ग्रामस्थांना पिंपरी फाटा ते निघोज या रस्त्याच्या कामाचा शब्द माजी आमदार विजय औटींच्या माध्यमातून पूर्ण करून दिला. या खेरीज बंधारे, रस्ते व अनेक वैयक्तिक लाभाच्या योजना पिंपरी जलसेनच्या नागरिकांना मिळवून दिल्या असून यापुढील काळात अनेक योजना प्रभावी राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे ठुबे म्हणाले. पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे  बोलताना की, आ.औटींच्या माध्यमातून पिंपरी जलसेन येथे सव्वा पाच कोटी रुपयांच्या डांबरी रस्त्याचे काम, जलउपससिंचनाचे वीजबिल १२ लाखांवरून कमी करून दिड लाखरुपये केले याखेरीज अनेक विकास कामे झाली असून मी देखील पंचायत समितीच्या माध्यमातून भरघोस निधी पिंपरी जलसेन साठी देणार असल्याचे डॉ पठारे म्हणाले.
         अध्यक्षस्थावरून बोलताना जी एस महानगर बँकेचे अध्यक्ष उदय शेळके म्हणाले की, स्व गुलाबराव शेळकेंचे पाणीदार पिंपरी जलसेनचे स्वप्न साकार करण्यासाठी ग्रामस्थांनी पाणी फौंडेशन च्या स्पर्धेत सहभागी घेऊन राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून गाव पाणीदार केले. पाणी फौंडेशनच्या कामांमुळे गावातील पाणीपातळी वाढली असून शेतकरी सुखी झाल्याचे समाधान सर्वांना झाले आहे. गावचा दुष्काळ कायमस्वरूपी नाहीसा करण्यासाठी आम्ही यावर्षी देखील पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेत सहभागी घेऊन गावातील उर्वरित भागात जलसंधारणाची कामे करणार आहेत. पिंपरी जलसेनच्या राष्ट्रीय पेयजल योजनेमुळे पिंपरी जलसेनच्या ग्रामस्थांचा पिण्याच्या पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटला असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या योजनेसाठी ६७ लाखांचा निधी मिळवून दिल्याबद्दल जि.प.सदस्य उज्वला ठुबे यांचे आभार उदय शेळके यांनी मानले.
    यावेळी उपसरपंच संदीप काळे, माजी सरपंच भास्कर शेळके, ग्रा.प सदस्य यशवंत अडसरे, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक कैलास शेळके, सेवा संस्थेचे संचालक कैलास घेमुड, तुकाराम कदम, रामदास शेळके, अभिमन्यू थोरात, विठ्ठल अडसरे, फक्कड शेळके, निवृत्ती अडसरे, बाळकृष्ण झावरे, अरविंद वाढवणे, बबन घेमुड, दगडू थोरात, सईद शेख, ज्ञानदेव वाढवणे, दिनेश शेळके, ज्ञानदेव थोरात, ठेकेदार रोकडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कदम यांनी केले तर आभार उपसरपंच संदीप काळे यांनी मानले. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top