टाकळी ढोकेश्वर येथील नवोदय विदयालयातील प्रकार निंदनीय आरोपीचा शोध घेऊन त्वरित कार्यवाही करावी - अनिल शेटे

0
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विदयालयात २९ ला रात्री अनोळखी व्यक्तीने घुसून  झोपलेल्या विद्यार्थिनींना पेटविण्याचा प्रयत्न झाला.यामध्ये वैष्णवी भांगरे ही विद्यार्थिनी गंभीर भाजली असून तिच्या सोबत राहणार्‍या मैत्रिणीथोडक्यात बचावल्याने मोठा अनर्थ टळला.असून थोडक्यात यावरून शालेय प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. आज पेटविण्याचा प्रयत्न होतो उदया अनेक भयानक प्रकार घडु शकतात.असे प्रकार होऊ नये म्हणून विदयालयाच्या आवारात cctv कॅमेरे त्याचप्रमाणे रात्री चे सुरक्षा रक्षक वाढविले पाहिजे.यासबधी शालेय प्रशासनाला शिवबा संघटना व प्रहार जनशक्ती यांच्याकडून  निवेदन देण्यात येणार असल्याचे शिवबा संघटनेचे अनिल शेटे यांनी संगितले.
तसेच आरोपी शोधून कडक कार्यवाही करण्यासंदर्भातही पोलिस निरीक्षक पारनेर यांना शिवबा संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top