माजी विद्यार्थ्यांकडून पिंपरी जलसेन विदयालयाला पुस्तके भेट

0
पिंपरी जलसेन / NEWS महाराष्ट्र दर्शन
पिंपरी जलसेन येथील ग्रामीण बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालयात विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने इयत्ता आठवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांना अभ्यास मित्र हे मार्गदर्शनपर पुस्तकाचे वाटप जी.एस.महानगर को ऑपरेटिव्ह बॅंकेचे अध्यक्ष ऍड उदयदादा शेळके यांच्या हस्ते  करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल उदय शेळकेंनी कौतुक करून सर्वांनी यांचे अनुकरण करावे असे आवाहन केले.


    दैनंदिन अभ्यासाखेरीज विद्यार्थ्यांना इतर ज्ञान मिळावे व शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी माजी विद्यार्थ्यांनी 'अभ्यास मित्र' हे मार्गदर्शनपर पुस्तकांचे वाटप करण्यात आले.  यामध्ये शाळेच्या माजी विद्यार्थी २०१० च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा  समावेश होता. यामध्ये तुषार काळे, भूषण थोरात, सुनिल थोरात,चेतन थोरात, मंगेश तांबे, राहुल एस.शेळके, राहुल ए.शेळके, नितेश शेळके,रोहन गागरे, जयेश अडसरे या विद्यार्थ्यांनच्या वतीने दहा हजार रुपये किंमतीच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. 
यावेळी उपस्थित शिक्षक मुख्याध्यापक विलास सपकाळ, उपमुख्याध्यापक दादाभाऊ बोरूडे, चंद्रशेखर ठूबे , शेख मॅडम, तसेच शैलेंद्र गायकवाड, गणेश पुणेकर, सरपंच कैलास घेमुड, उपसरपंच संदिप काळे, तसेच आमदार निलेश लंके समर्थक विनोद कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top