कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी चिमुकलीने दिली आपली पिगी बँक

0
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व जिल्हा सहाय्यता निधीत मदतीचा ओघ वाढला.
चंद्रपूर, दि.२२  : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूच्या या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत असून या संकटावर मात करण्यासाठी आवश्यक निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 या माध्यमातून जमा केला जात आहे. तिसऱ्या वर्गातील तनिष्का शर्माने आपली पिगी बँक देऊन कोरोना विरुध्दच्या लढ्यासाठी जिल्हा सहाय्यता निधीत योगदान दिले.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मदत निधीचे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनास  उत्तम प्रतिसाद मिळत असून या आवाहनास प्रतिसाद देत अनेक संस्था, व्यक्ती यांनी जिल्हा सहायता निधीच्या खात्यात देणग्या देणे सुरू केले आहे.

मदतीसाठी या बँक खात्यात निधी जमा करा.
कलेक्टर चंद्रपूर कोव्हिड-19 या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक ऑफ इंडियामध्ये ‍ स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून खाते क्रमांक  960310210000048  असून यासाठी आयएफएससी कोड  BKIDOOO9603  असा आहे. जिल्ह्यातील उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था, धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी सढळ हाताने मदतीची रक्कम जमा  करावी  असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top