पारनेर: सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे जगभरात लॉकडाऊन आहे. याचाच फायदा सध्या किराणा माल विक्रेते घेताना दिसत आहेत. खेड्यापाड्यातील सर्व सामान्य जनतेस चढत्या दराने किराना मिळत असुन शासनाने ठरवुन दिलेल्या रक्कमेप्रमाने किराणा माल मिळावा व चढत्या दराने माल विकणाऱ्या किराना दुकानावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महेश पाठक ,प्रधान सचिव अन्न व नागरी पुरवठा मुंबई व जिलाधिकारी अ.नगर यांच्याकडे धोत्रे बु. येथील अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोड़े व जिल्हा उपाध्यक्ष आकाश वाबळे व कार्याध्यक्ष विकास झावरे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
लाॅकडाउन असल्यामुळे खेड्यातील सर्व सामान्य जनतेस आपल्याच गावातील दुकानातुन असेल त्या भावाने किराना माल खरेदी करावा लागत आहे. याबाबत दुकानदारांना विचारपुस केली असता त्यांच्या म्हणनेनुसार ''आम्हालाच चढ्या भावाने खरेदी करावा लागतो त्यामुळे आम्हाला ही चढ्या भावाने विक्रि करावी लागते." असे अरुण रोडे यांनी सांगितले. त्यामुळे संपुर्ण जिल्ह्यातील रीटेल व होलसेल किराना दुकानांची चौकशी होऊन कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समिती चे जिल्हाअध्यक्ष अरुण रोड़े, उपाध्यक्ष आकाश वाबळे, कार्याध्यक्ष विकास झावरे, तालुका समिती दत्तात्रय कुसकर, मयुर लहासे, किरण आल्हाट, बबन गुंड व अन्य सदस्यांनी केली आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद