पारनेर : पारनेर तालुक्यातील किन्ही येथील डोंगर पेटवल्याने लागलेल्या आगीत डोंगरालगत असलेल्या लंकाबाई रंभा पवार यांच्या जनावरांच्या गोठ्याचे छप्पर जळाले आहे. तसेच घराला हि आग लागली होती. पण गावातील तरूणांनी ती आग विझवली तसेच साहेबराव पवार यांची आंब्याची मोठी झाडं पुर्णपणे जळुन खाक झाली आहेत. तसेच बाजीराव नाना पवार यांच्या बोअरवेलचा पाईप व केबल जळाली आहे. आग आता आटोक्यात आली असुन आग विझवण्यासाठी गावातील तरूण व वनविभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. घटनास्थळी पारनेर पोलीस स्टेशन चे सहा. पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी तातडीने जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
किन्ही ( पारनेर ) येथे डोंगर पेटून डोंगरालगतच्या शेतकऱ्यांचे नुकसान...
एप्रिल २१, २०२०
0
Tags
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद