पारनेर :- कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता या जैविक युद्धाला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजना सरकारने ठरवून दिलेल्या सर्व आटी व नियमांचे पालन करत पारनेर नगर मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांचा कनवाळू व साधेपणा. समाजासाठी झोकुन देत दिनरात्र समाजाची सेवा करणारा एक सामान्य आमदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. माझ्या मतदार संघात एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही असे वारंवार सांगत, गेले अनेक दिवस शासनाच्या सर्व नियमाचे पालन करत मतदार संघातील गावोगावी किराणा वाटप, भाजीपाला वाटप व अन्नछत्राच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी मतदार संघातील व मतदार संघाच्या बाहेरील हजारो उपाशी जनतेस अन्नदान करत आहेत.
सहा आठवड्यापूर्वी लॉकडाऊन झाल्या पासून मतदार संघातील एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही याची स्वतः रस्त्यावर उतरून खात्री करत गोरगरीब, निराधार, गरीब, परप्रांतीय व इतर जिल्ह्यातून आलेल्या शेतमजूर, कामगार, वाटसरू, वाहन चालक यांना पोटभर सुरुची भोजन पुरविणारा आमदार ही ओळख असतानाही मनुष्य प्राण्यांबरोबर मुक्या प्राण्यांचाही विचार करणारा प्राणीमित्र ही नवीन ओळख आज मिळाली.
लॉकडाऊन झाल्यापासून महाराष्ट्र सरकारने सर्व देवस्थाने बंद करण्याचा निर्णय घेतला असल्या कारणाने व जनतेनेही आपले घर सोडून बाहेर पडू नये असे आवाहन केल्यानंतर हजारो भाविक भक्त कुठल्याही मंदिर परिसरात जाण्याचे टाळत आहेत. त्यामुळे पारनेर तालुक्यातील वडगाव दर्या येथील माता दर्याबाई व वेल्हाबाई या जागृत देवस्थान असणाऱ्या मंदिर परिसरात शेकडो माकडांवर उपासमारीची वेळ आली आहे. मानवता हाच धर्म हे ब्रीद सांभाळणाऱ्या आमदार लंके यांच्या लक्षात हा प्रकार आला असता त्यांनी तात्काळ त्यांचे सहकारी असणारे डॉक्टर कावरे, राजु खोसे, श्रीकांत चौरे, निलेश आढाव, अमोल दळवी ,अनिल सूर्यवंशी यांच्या मदतीने फळे घेऊन जात सर्व मुक्या प्राण्यांना स्वतःच्या हाताने पोटभर फळे खाऊ घातली.
मनुष्य प्राणी असो की मुकेप्राणी त्यांच्या बद्दल असणारी तळमळ पाहता भावनिक होणारा प्रसंग व या संकट काळात मानवतेचे प्रत्येक दिवशी आमदार लंके यांचे वेगळे रूप मतदार संघाला अनुभवास मिळत आहे.
मनुष्य प्राण्याबरोबर मुक्या प्राण्यांवरही तितकेच प्रेम करणारे जननायक, प्राणीमित्र आमदार निलेश लंके यांच्या या सार्वभौम कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद