पारनेर - पारनेर तालुक्यातील देविभोयरे येथील कौलावस्तीवर गावठी दारू विक्रीची खबर पोलिसांना दिल्याच्या रागातुन एका महिलेला मारहान करत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार देवीभोयरे येथील कौला वस्तीवर रिकाम्या बिसलरी बाटलीत गावठी दारू भरून विक्री चालु होती, त्यामुळे येथे अनेकांची वर्दळ होऊन त्रास सहन करावा लागत असल्याची माहीती येथील महीलेने फोनवर लोकजागृती सामाजिक संस्थेला दिली. संस्थेने याबाबत खात्री करून पारनेर पोलिसांना हि माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तिथे छापा मारला होता. पोलिसांना आपल्या धंद्याची माहिती महिलेच्या पतीने दिली असावी असा संशय घेवून त्यांना आरोपी संगीता तिकोने, सोनाली पुष्पा व ओमकार तिकोने(पूर्ण नाव माहीत नाही) सर्व राहणार कौलावस्ती देवीभोयरे तालुका पारनेर याबाबत जाब विचारून जबर मारहान केली. याबाबत फिर्याद देण्यासाठी पती - पत्नी पारनेरला निघाले असता त्यांना ओंकार तिकोने याने लोखंडी खोऱ्याने महिलेच्या पतीस मारहाण केली व महिलेस पाठीमागून मिठी मारून खाली पाडून अंगाशी लगट करून फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. व जर आमच्या विरोधात तक्रार दाखल केली तर तुला सोडणार नाही. असा दम देऊन शिवीगाळ केली व पती व पत्नी यांचा मोबाईल फोडून नुकसान केले. आरोपी विरोधात भा.द.वि. कलम 354,324,323,504,506,427,34 प्रमाणे पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल एन .एम शेलार करत आहेत.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद