निघोज(दि-२३): राज्य सरकारने विद्यार्थ्यांचा आरोग्याचा विचार करूनच योग्य तो निर्णय घ्यावा असे निवेदन पारनेर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मा.तालुकाध्यक्ष निवृत्ती वरखडे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार शिक्षणमंत्री उदय सामंत यांना मेल व ट्विटरद्वारे निवेदन दिले आहे.
मागील महिनाभरापासुन कोरोना रोगाच्या प्रादुर्भावाने देशभरात थैमान घातले असल्याने शैक्षणिक संस्थांसह संपुर्ण देश लॉकडाऊन स्थितीत आहे. हा लॉकडाऊन अचानक जाहीर झाल्याने पदवीच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना घराकडे धाव घ्यावी लागली होती. त्यामुळे सोबत कुठलेही शैक्षणिक साहित्य न घेता त्यांनी थेट घर गाठले असल्याने या काळात विद्यार्थी अभ्यासापासुन दुरावले आहेत. अभ्यासक्रम अपुर्ण असल्याने आणि तोंडावर असलेल्या परीक्षेचं कशी होणार याबाबत देखील संभ्रम निर्माण झाला आहे. काही ठिकाणी ऑनलाइन अथवा इतर पद्धतीचा अवलंब केला जाईल अशी चर्चा असली तरी त्याविषयी अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. ऑनलाईन परिक्षा घेणं सद्यस्थितीत महाराष्ट्रात खूप कठीण आहे. ग्रामीण भागातील अनेक गावांत आज नेटवर्कची मोठी समस्या आहे. या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने यावर निर्णय घ्यावा.
महाराष्ट्रातील अनेक मोठ्या शहरात उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील आहेत. सध्या लॉकडाउनमुळे ते मूळगावी आहेत. अनेक व्यवहार ठप्प असल्याने कृषी क्षेत्राची अवस्था बिकट आहे. अशा वेळी भाड्यासाठी या विद्यार्थ्यांकडे तगादा लावणे योग्य नाही. त्यांना भाडे माफ करावे किंवा ते भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची आवश्यकता आहे. परिक्षा होणे गरजेचे आहे असे मत वरखडे यांनी व्यक्त केले.
यावेळी समिर पठाण, ऋषीकेश घोगरे, गणेश लाळगे, हर्षद चौधरी, संकेत शेजवळ यांनी परीक्षा व्हाव्यात परंतु विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊनच पुढील पावले उचलण्यात यावीत असे म्हटले आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद