निघोज : सध्या कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत अनेक छोट्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर सर्वसामान्य व्यक्तीस व्यवसाय सुरु करण्यास अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. हीच गोष्ट निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद यांच्या लक्षात आल्याने त्यांनी सर्वसामान्य व्यक्तीसाठी सामाजिक बांधिलकी लक्षात ठेऊन व्यावसायिकांसाठी 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज फक्त 12 टक्के व्याजदराने डेली कलेक्शनवर विनातारण या तत्वावर देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद यांनी News महाराष्ट्र दर्शनशी बोलताना दिली.
लॉकडाऊनमूळे व्यवसायिकांचे धंदे बंद असल्याने याचा आर्थिक परिस्थीतीवर मोठा परिणाम होणार आहे. सर्वसामान्य गोरगरीब गरजू कुटुंबांना तब्बल एक ते दीड महिना घरी बसावे लागले असल्याने पैसा येणार कोठून हा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा परिणाम व्यवसायावर परिणाम होणार असून यासाठी निघोज नागरी पतसंस्थेने 12 टक्के व्याजदराने विनातारण व्यवसायिकांना कर्ज देउन परस्थितीला सामोरे जाण्यासाठी हा पर्याय निर्माण करुन दिला आहे. - वसंत कवाद सर
या योजनेच्या अधिक माहितीसाठी कर्ज वितरण विभाग सिमा मॅडम क्रमांक 9623230441 यांच्याशी सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत संपर्क साधावा असे आवाहन पतसंस्थेचे उपाध्यक्ष नामदेव थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय लंके व संचालक मंडळाने केले आहे. राज्यात आपत्तीग्रस्तांना मदत असो वा लोकांना आधार देण्याचे काम असो अशा सामाजिक कामांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. बाबासाहेब कवाद यांनी गेली अनेक वर्षात प्राधान्य दिले आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद व त्यांचे सहकारी यांनी गावातील गोरगरीब गरजू घटकांना किराणा माल दिला असून मुलिकादेवी विद्यालयातील केंद्रावर असणार्या १०४ मजुरांच्या जेवणाचा प्रश्न सोडवला आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनमुळे होत असलेल्या व्यवसायिकांच्या आर्थिक मंदीचा प्रश्न सोडविण्यासाठी निर्णायक व समाजहिताची भुमिका घेउन सेवाभाव करण्याचे काम केले असून या त्यांच्या भुमिकेचे सर्वत्र कौतुक होत असून संस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद व त्यांच्या सर्व सहकार्यांना पतसंस्थेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक व ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.
आपण सर्वसमावेशक बातमीदारी करत आहात. धन्यवाद
उत्तर द्याहटवा