ब्रेकिंग :- नगरकरांच्या चिंतेत वाढ जिल्ह्यात आणखी २ रुग्णाची भर

0
अहमदनगर :- नगरकरांची चिंता आणखी वाढली असून आज नगर जिल्ह्यातील जामखेड येथे आणखी दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून एकूण बाधित रुग्णांची संख्या ४० वर गेली आहे. काल पाठवलेला अहवाल आज पॉझिटिव्ह आला असून एकट्या जामखेड मध्ये एकूण १४ कोरोना बाधित रुग्न आहेत.


बुधवारी कोरोना बाधीत आढळलेल्या २ व्यक्तींचे हे दोन्ही मित्र असून त्यांना लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीत व्यक्तींची संख्या आता ४० झाली आहे. त्यापैकी २४ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ०२ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या बूथ हॉस्पिटल मध्ये १६ रुग्ण असून या दोघांना आता तिकडे हलविण्यात येणार आहे.
आज बाधीत आढळलेल्या व्यक्तींपैकी एक जण २३ वर्षाचा तर दुसरा १६ वर्षाचा असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top