अहमदनगर :- कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुस्लिम बांधवांनी या #coronavirus च्या संकटात शासनाला चांगली साथ दिली. कुठेही धार्मिक आणि सार्वजनिक स्थळी एकत्र न येता रमजानचा पवित्र सण साजरा करूया आणि आपल्या व समाजाच्या आरोग्याला प्राधान्य देऊया. याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मुस्लिम बांधवाना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा देत आपण यंदा रमजान महिन्यात सोशल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन करावे आणि घरगुती स्वरूपातच धार्मिक कार्यक्रम करण्याचेही यावेळी आवाहन केले आहे.
नगरमध्ये रमजान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मुस्लिम बांधव तीस दिवस रोजे ठेवतात. या सणासाठी लागणाऱ्या साहित्याची पंधरा दिवसांपूर्वीच खरेदी करण्यात येते. यंदा मात्र या सणावर कोरोनाचे सावट आहे. मुकुंदनगर व आलमगीर ही दोन ठिकाणे हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आली होती. सर्जेपुरा, झेंडीगेट बागातही लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे.
सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. त्यामुळे यंदा घरातच नमाज अदा करावा लागणार आहेत. रमजानमध्ये दरवर्षी मोठी आर्थिक उलाढाल होत असते. परराज्यांतून मोठ्या प्रमाणात सुकामेवा विक्रीसाठी येतो. यंदा मात्र फळे व स्थानिक सुक्यामेव्यावरच मुस्लिम बांधवांना समाधान मानावे लागणार आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद