स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत निघोज येथील ४४ लाभार्थ्यांच्या खात्यावर वैयक्तिक सौचालयाचे अनुदान जमा

0
पारनेर/ दि.०३ : तालुक्यातील निघोज येथे स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत वैयक्तीक शौचालयाच्या अनुदानापोटी निघोज येथील ४४ लाभार्थ्यांना प्रत्येकी १२ हजार अनुदान जमा झाले असून एकूण ५ लाख २८ हजार रुपये  लाभार्थ्यांच्या बँक खात्यांवर जमा झाले आहेत अशी माहिती सरपंच ठकाराम लंके यांनी दिली आहे.

      आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नांतुन अनेक वैयक्तिक लाभाच्या योजना सर्व सामान्य गरजू लोकांना लाभदायक ठरणार आहे - सरपंच ठकाराम लंके
   
  निघोज ग्रामपंचायतच्या वतीने गावातील अनेक लाभार्थ्यांचे प्रस्ताव तयार करून पाठविले होते. त्यापैकी ४४ लाभार्थ्यांचे पाच लाख पन्नास हजाराचे शौचालयाचे अनुदान  जमा झाले असुन उर्वरीत शौचालयाचे अनुदानही टप्प्याटप्याने जमा होईल.

     निघोज परीसरातील अनेक विकास कामे आमदार  निलेश लंके यांच्या आमदार व इतर निधिच्या माध्यमातून  निघोज परीसराचा चेहरा मोहरा बदलू असे मत सरपंच ठकाराम  लंके यांनी व्यक्त केले आहे.

      अनुदान प्राप्त लाभार्थ्यांनी सरपंच  ठकाराम लंके व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. 

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top